सूर्य, बुध आणि शुक्र यांची शुभ युति: धनु राशीत बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग; कुंभ राशीसह 6 राशींसाठी लाभदायक काळ

धनु राशीत सूर्याच्या आगमनामुळे बुधादित्य योग तयार झाला आहे. 28 डिसेंबरपर्यंत हा शुभ योग राहणार आहे. बुध आणि सूर्य एका राशीत एकत्र आल्यानंतर बुधादित्य योग तयार होतो.

शुक्र देखील अगोदरच धनु राशीत आहे. त्यामुळे बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मीनारायण नावाचा आणखी एक शुभ योग तयार होत आहे.

Budhaditya and Lakshmi Narayan Yog

हे दोन मोठे शुभ योग तयार झाल्यामुळे अनेक लोकांच्या नोकरी आणि व्यवसायात मोठे बदल होऊ शकतात. जे आनंददायी राहतील.

या 6 राशींना लाभ मिळणार

शुभ तीन ग्रहांच्या शुभ संयोगामुळे मेष, कर्क, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती प्राप्त होऊ शकते. मालमत्ता आणि आर्थिक बाबतीत लाभ मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने वेळ उत्तम राहील. नशीबाची साथ मिळू शकते. कौटुंबिक बाबींसाठीही वेळ शुभ आहे.

तर या 5 राशींसाठी संमिश्र काळ राहील

तिन्ही ग्रहांच्या संयोगामुळे वृषभ, मिथुन, सिंह, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी संमिश्र काळ राहील. या 5 राशीच्या लोकांना पैसा तर मिळेलच पण खर्चही वाढेल. काही प्रकरणांमध्ये, नशीब तुमच्या सोबत राहील, तर कामात व्यत्यय, तणाव आणि वाद होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे.

मकर राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी

सूर्य, बुध आणि शुक्र एकाच राशीत आल्याने मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढण्याची शकता आहे. कामात अडथळे येऊ शकतात. वाद होऊ शकतात. पैशाची हानी आणि आरोग्याशी संबंधित समस्या देखील असू शकतात. नवीन काम सुरू करणे काही काळ टाळा. कर्ज घेऊ नका. कामात निष्काळजीपणा आणि घाई करू नका.

बुधादित्य योग प्रगती देणारा

मिथुन, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना सूर्य आणि बुधाच्या संयोगाने तयार झालेल्या शुभ बुधादित्य योगाचा अधिक फायदा होईल. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या उत्तम संधी मिळतील. याशिवाय कर्क आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ शुभ राहील. या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे मोठ्या प्रशासकीय योजना बनतील. त्यांच्यावर काम होईल आणि फायदाही होईल. शेअर बाजाराशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला असू शकतो.

आर्थिक लाभ देणारा असतो लक्ष्मीनारायण योग

बुध आणि शुक्र एकत्र आल्यावर लक्ष्मी नारायण योगही तयार होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. यामध्ये बुध ग्रहाच्या प्रभावामुळे मोठे आर्थिक व्यवहार, खरेदी आणि गुंतवणूक होत आहे. बुद्धीवर परिणाम करणारा हा ग्रह आहे. त्याच वेळी शुक्र त्यांच्यामध्ये आनंद आणि लाभ वाढवतो. या शुभ योगाच्या प्रभावाने आर्थिक लाभ, सौभाग्य आणि समृद्धी वाढते. देशाच्या आर्थिक स्थितीसाठी स्थिती शुभ राहील. या शुभ योगाने महागाई कमी होण्याची शक्यता आहे.

Follow us on

Sharing Is Caring: