18 वर्षा नंतर तुला राशी मध्ये प्रवेश करणार छाया ग्रह केतु, या राशीचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कार्यात यश मिळण्याचा योग

अध्यात्मातील सर्वोत्तम ग्रह केतू 18 वर्षांनंतर 12 एप्रिल रोजी दुपारी 3:27 वाजता पुन्हा तूळ राशीत प्रवेश करत आहे. केतू ग्रहाचे हे गोचर 3 राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका निश्चित वेळेच्या अंतराने गोचर करतो. या राशी बदलाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. तसेच हे गोचर काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. छाया ग्रह केतू मंगळाचे अधिपत्‍य करणार्‍या वृश्चिक राशीतून 12 एप्रिल 2022 रोजी शुक्राचे अधिपत्‍य असलेल्या तूळ राशीत प्रवेश करील.

केतू ग्रह सुमारे 18 वर्षांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. केतूच्या राशी बदलाचा प्रभाव सर्व राशींवर असेल, परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना या राशी बदलातून विशेष धनलाभ मिळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या 3 राशी..

मकर : या राशीला 12 एप्रिलपासून चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण केतू ग्रह तुमच्या राशीच्या 11व्या भावात भ्रमण करेल. ज्याला उत्पन्न आणि नफा याचे भाव म्हणतात. म्हणून, यावेळी आपण अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळवू शकता.

यासोबतच व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. यासोबतच तुम्हाला यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात नवीन डील पूर्ण करू शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. एकंदरीत केतूचे गोचर तुमच्यासाठी शुभ राहणार आहे.

कर्क : केतू ग्रहाचे गोचर तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण केतू ग्रह तुमच्या चौथ्या भावात राशी परिवर्तन करेल. ज्याला सुखाचे आणि माता यांचे भाव म्हणतात. त्यामुळे केतूची ही स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी उत्साहवर्धक ठरू शकते. ज्यांना विविध भाषा शिकण्यात रस आहे किंवा भाषांतरकार म्हणून करिअर करायचे आहे त्यांच्यासाठीही हा काळ विशेष अनुकूल ठरू शकतो.

तसेच यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. जे अविवाहित आहेत, ते लोक या काळात प्रेमसंबंधात येऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख देखील मिळेल. यावेळी नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देण्याची शक्यता आहे.

कुंभ : केतूचे राशी बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण केतू ग्रह तुमच्या नवव्या भावात प्रवेश करेल, जे भाग्याचे आणि परदेश भाव मानला जातो. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.तसेच तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल.

यावेळी तुम्ही व्यावसायिक प्रवास देखील करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळू शकते. तसेच, ज्यांची वेतनवाढ थांबली होती, त्यांना यावेळी बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. एकंदरीत केतू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.