अरशद वारसी ने शेयर केला पाकिस्तान च्या रॉकेट लॉन्च चा Video! पोट धरून हसत आहेत युजर्स

नवी दिल्ली: बॉलिवूड चा ‘जॉली’ एक्टर या अरशद वारसी (Arshad Warsi) याने एक व्हिडीओ शेयर केला आहे जो अत्यंत वेगाने वायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये अरशद ने पाकिस्तानला मजेदार पद्धतीने चिमटा काढला आहे. आता व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.

हे शंभर टक्के पक्के आहे कि हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचं हसणं काही थांबणार नाही. एकीकडे पाकिस्तान चे लोक आता पर्यंत भारताच्या चंद्रयान 2 बद्दल भारता बद्दल खोट्या अफवा पसरवत आहे तेथे अरशद वारसी ने पाकिस्तान च्या रॉकेट लॉन्च बद्दल व्हिडीओ शेयर करून त्यांची मजा घेतली आहे. तुम्हीच पहा हा व्हिडीओ…

ट्विटर वर अरशद वारसी ने शेयर केलेला व्हिडीओ ‘चंद्रयान 2’ बद्दल आहे, ज्यामध्ये पाकिस्तानची जोरदार खिल्ली उडवली आहे. आपण पाहू शकता कि या व्हिडीओ मध्ये काही लोक मिळून रॉकेटच्या डिजाईन चा एक फुगा उडवताना दिसत आहे.

परंतु काही लोक हा व्हिडीओ पाकिस्तान चा तर काही लोक बांग्लादेश चा असल्याचे सांगत आहेत. पण अरशद ने या व्हिडीओला शेयर करताना लिहिले आहे, ‘मला काहीच कल्पना नव्हती कि पाकिस्तान ने देखील एक रॉकेट लॉन्च केला आहे.’ आता लोक अरशद च्या या पोस्टवर मजेदार कमेंट्स करत आहेत आणि मजा घेत आहेत.

अरशद वारसी च्या येणाऱ्या चित्रपटा बद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो ‘पागलपंती’ मध्ये दिसून येईल. ज्या मध्ये अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूज आणि कृति खरबंदा हे कलाकार त्याच्या सोबत असतील. या व्यतिरिक्त तो ‘मुंबई सागा’ मध्ये देखील दिसून येईल. या फिल्म मध्ये जॉन अब्राहम, सुनील शेट्टी आणि इमरान हाशमी त्याच्या सोबत असतील.