inspiration

हात नाहीत पण मिळवले ड्रायव्हींग लायसन्स, चालवली 22,000 किलोमीटर गाडी

माणसाकडे हिम्मत असेल तर तो असाध्य लक्षही साध्य करू शकतो याचे उत्तम उदाहरण विवेक अग्निहोत्री आहेत. इंदौर मध्ये राहणारे विक्रम जेव्हा सात वर्षाचे होते तेव्हा त्याचे हात विजेचा करंट लागल्याने निकामी झाले त्यामुळे दोन्ही हात कापावे लागले. पण यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली नाही. तुम्हाला समजल्यावर आश्चर्य होईल की हाताने करण्याचे सर्व काम ते पायाने करतात. विक्रमला पोहता येते आणि ते कार पण चालवू शकतात. रेग्युलर शाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून त्यांच्याकडे मास्टर डिग्री आहे आणि ते मोटीवेशनल स्पीकर आहेत आणि सोबतच गैस एजन्सी पण चालवितात.

तसे विक्रम पहिल्या पासून स्वताचे सर्व काम स्वताच करतात. पण तीन वर्षापूर्वी त्यांना जाणीव झाली की आपल्या बेसिक गरजांसाठी का दुसऱ्याच्या आधारावर राहावे. हा विचार करूनच त्यांनी ऑटोमेटिक गियर शिफ्ट होणारी गाडी खरेदी केली, पण समस्या ही होती की त्यांना कोणत्याही ड्रायव्हींग ट्रेनिंग इंस्टीट्युट मध्ये कोणीही ड्रायव्हींग शिकविण्यास तयार झाले नाही. सगळे हाच विचार करत होते की बिन हातांचा हा व्यक्ती कार ड्रायव्हींग कशी करेल. पण ज्या व्यक्तीने आता पर्यंत अनेक मोठ्या समस्यांचा सामना यशस्वी केला होता त्यांच्यासाठी ही काही मोठी समस्या नव्हती. शेवटी त्यांनी स्वताच कार शिकण्याचा निर्णय केला. त्यांनी यूट्यूब वर व्हिडीओ पाहून कार चालवण्याची टेक्निक शिकून घेतले.

अश्या पद्धतीने शेवटी ते कार चालविण्यास शिकले पण यानंतरची समस्या होती आरटीओ ऑफिस कडून ड्रायव्हींग लायसन्स मिळविणे. परिवहन विभागाचे अधिकारी हे मानण्यास तयार नव्हते की हात नसलेला व्यक्ती कार चालवू शकतो. त्यांनी डिसेंबर 2014 मध्ये ड्रायव्हींग लायसन्ससाठी अर्ज केला होता, पण त्यांना लायसन्स नाही मिळाले तेव्हा त्यांनी राज्याच्या परिवहन मंत्र्या पासून ते केंद्रीय परिवहन मंत्री आणि परिवहन मंत्रालय ते प्रधानमंत्री पर्यंत आपले म्हणणे मांडले. विक्रम सर्व अधिकाऱ्यांना सांगत होते की एक वेळा त्यांची ड्रायव्हींग पाहिली जावी. यानंतर उप परिवहन आयुक्त त्यांची ड्रायव्हींग पाहण्यास आले. विक्रम ने त्यांना कार मध्ये बसवून कठीण रस्त्यावरून गाडी चालवून दाखवली.

यानंतर मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये आरटीओ ने त्यांना लायसन्स दिले. विक्रमकडे एक ऑटोमेटिक गियर शिफ्ट होणारी कार आहे आणि ते स्टीयरिंग आपल्या उजव्या पायाने पकडतात आणि डावा पाय एक्सेलरेटर वर ठेवतात. आपल्या कारच्या डाव्या बाजूलाच त्यांनी ब्रेक आणि एक्सेलरेटर लावले आहेत. विक्रम ने लायसन्स मिळाल्या पासून आता पर्यंत 22,000 किलोमीटर गाडी चालवली आहे. आता त्यांना लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड बनविण्याची इच्छा आहे. ते वाइटल स्पार्क वेलफेयर सोसाइटी चे चेयरमैन आहेत आणि मोटिवेशनल लेक्चर्स देतात. विक्रम एक गैस एजंसी चालवतात आणि सोबतच एलएलबी करत आहेत


Show More

Related Articles

Back to top button