Connect with us

याची पाने केस लांब आणि घनदाट करतात तर माइग्रेन मध्ये आराम देतात, चेहऱ्याच्या सूरकुट्या दूर करते

Hair Care

याची पाने केस लांब आणि घनदाट करतात तर माइग्रेन मध्ये आराम देतात, चेहऱ्याच्या सूरकुट्या दूर करते

रोजमेरी ही एक सुवासिक जडीबुटी आहे. याची पाने सुई सारखी टोकदार असतात तर याची फुले सफेद, गुलाबी, जांभळी किंवा निळे असतात.याचा वापर अनेक प्रकारच्या खाद्यापादार्थामध्ये पण केला जातो. या जडीबुटीमध्ये लोह, कैल्शियम असते.

प्राचीनकाळा पासूनच रोजमेरी जडीबुटीचा उपयोग त्यामध्ये असलेल्या औषधीय गुणांच्या मुळे मोठ्या प्रमाणात केला जातो. पारंपारिक रुपात रोजमेरीचा उपयोग मासपेशी मधील वेदना कमी करण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच केसांचे आरोग्य वाढवण्यासाठी केला जातो.

साहित्य :

रोजमेरी ची पाने

गरम पाणी

कृती :

रोजमेरी एका भांड्यात उकळवून घ्या

डोके टॉवेलने झाकून घ्या आणि जवळपास 10 मिनिट पर्यंत या पाण्याची वाफ घ्या.

या रोजमेरीचा सुगंध तुमच्या कपाळा पर्यंत पोहचेल तसेच तुम्हाला माइग्रेनमुळे होणाऱ्या असहनीय वेदने पासून सुटका मिळेल.

रोजमेरी चे तेल आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर असते. रोजमेरीचे तेल नियमित केसांना लावल्यामुळे केस लांब, घनदाट होण्यास सुरुवात होते. रोजमेरीचे तेल केसांना गळण्या पासून थांबवते तसेच केसांची संख्या वाढवण्यास मदत करते. तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच्या पानांची पेस्ट बनवून केसांना लावू शकता. पण काळजी घ्यावी की डोळ्या मध्ये याचे पाणी जाता कामा नये.

रोजमेरी मध्ये Anti-ageing तत्व आढळतात. यासाठी Anti-ageing क्रीम (available at ayurvedic store) मध्ये रोजमेरीचा वापर केलेला असतो. रोजमेरीच्या नियमित वापरामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तसेच रोजमेरी आपल्या त्वचेच्या मृत कोशिकांना पुनर्जीवित करण्याचे काम करते. रोजमेरीच्या वापरामुळे आपल्या त्वचेच्या टोन मध्ये सुधार होतो तसेच रक्तसंचार वाढतो. तुम्हाला वाटल्यास याच्या पानांची पेस्ट बनवून त्वचेवर लावू शकता. काही वेळाने कोमट पाण्याने धुवून टाकावे. पण काळजी घ्यावी की डोळ्या मध्ये याचे पाणी जाता कामा नये.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : पोट साफ होत नाही, मुरुमे येतात, झोप येत नाही तर करा हा 1 मिनिटाचा उपाय

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top