celebritiesPeople

हे कारण होते श्रीदेवींचे पार्थिव आणण्यासाठी अनिल अंबानींनी पाठवले जेट!

भारताची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी पंचतत्वात विलीन झाली. मात्र तिच्या निधनानंतरचे तीन दिवस बोनी कपूर आणि त्यांच्या परिवारासाठी काहीसे कठीण होते. कारण श्रीदेवी यांचा मृत्यू दुबईत अचानक झाल्याने पार्थिव दुबईतून भारतात परत आणणे मोठे अवघड काम होऊन बसले होते. मात्र या सर्व कठीण प्रसंगात अनिल अंबानींनी मोठी साथ दिली. श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी त्यांनी आपले प्रायव्हेट जेट पाठवले. पण अनिल अंबानींनी ही मदत कोणत्या नात्यातून केली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

काय आहे श्रीदेवींशी अनिल अंबानी यांचे नाते?

पण अनिल अंबानी आणि श्रीदेवी यांचे नाते तसे जूनेच आहे. मोहित मारवाह यांच्या लग्नापासून जुळलेले हे स्नेहसंबंध कायम राहिले आहेत आणि याच नात्यातून अनिल अंबानींनी ही मदत केली. श्रीदेवी आपल्या कुटुंबियांसमवेत मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेली होती. हे लग्न २४ फेब्रुवारीला होते. मोहितचे लग्न अंतरा मोतीवाला हिच्यासोबत होते. अंतरा अनिल अंबानी यांची पत्नी टिना अंबानी यांची भाची आहे. तर मोहित मारवाह बोनी कपूरचा भाचा आहे. बोनी कपूर-अनिल कपूर-संजय कपूर यांची बहिण आणि सुरेंद्र कपूर यांची मुलगी रीना मारवाह हिचा तो मुलगा आहे.

नववधूप्रमाणे अखेरचा निरोप

कांजीवरम साडी घालून लाल रंगाची मोठी टिकली आणि साज शृंगारासहित श्रीदेवीला अखेरचा निरोप देण्यात आला. तिच्या अंतिम दर्शनासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. तर चाहत्यांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. बोनी कपूरसह दोन्ही मुलींनी श्रीदेवींना मुखाग्नी दिला.


Show More

Related Articles

Back to top button