Breaking News
Home / राशिफल / शुक्र राशी बदल, कुंभ राशीतुन मीन राशीत केला प्रवेश, या लोकांसाठी राहणार शुभ काळ

शुक्र राशी बदल, कुंभ राशीतुन मीन राशीत केला प्रवेश, या लोकांसाठी राहणार शुभ काळ

2 फेब्रुवारीच्या रात्री शुक्र मीन राशीत आला आहे. मीन मधील शुक्र उच्च असतो. याराशी मध्ये शुक्र 28 फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे. शुक्र ग्रह हा वैभव आणि संपन्नता देणारा ग्रह आहे. शुक्र उच्च असल्याने व्यापारी लोकांना याचे शुभ फळ मिळतील असे मानले जाते. येथे आपण 12 राशींवर शुक्र मीन राशीत असल्याने काय परिणाम होतील हे जाणून घेऊ.

मेष – या राशीसाठी वेळ मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. उत्साहात कोणतेही काम करू नका तर विचारपूर्वक काम करा. खर्च जास्त राहू शकतो. त्यामुळे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. पैश्यांची कमी होऊ शकते.

वृषभ – खर्च वाढण्याची शक्यता जास्त आहे. विनाकारण आपला वेळ वाया जाऊ शकतो आणि पूर्व नियोजिक योजने अनुसार काम करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कामावर फोकस ठेवून त्यादृष्टीने काम केले पाहिजे.

मिथुन – बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे आणि धनलाभ होऊ शकतो. व्यापारामध्ये धन लाभ होऊ शकतो. नोकरी मध्ये मदत होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल.

कर्क – या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. आपल्याला हाती घेतलेल्या कार्यात यश मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काळ उत्तम आहे. आपणास लाभ होण्याचे योग आहेत.

सिंह – आत्मविश्वास थोडा कमी होऊ शकतो. मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे, एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊनच निर्णय घेतला पाहिजे.

कन्या – योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास चांगले राहील. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील. धैर्याने काम करावे. आपणास आर्थिक दृष्ट्या हा काळ चांगला राहणार आहे. आपल्याला नोकरी मध्ये प्रमोशन मिळू शकते.

तुला – आपल्यासाठी हा ग्रह लाभदायक राहील. मोठे यश मिळण्याची आहे शक्यता. आरोग्य चांगले राहील. सुख-सुविधांवर खर्च करावा लागू शकतो. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील.

वृश्चिक – धन आणि मानसन्मानाची प्राप्ती होऊ शकते. दीर्घकाळापासून अडकलेली कामे मार्गी लागतील. यश प्राप्ती होईल. कुटुंबामध्ये सुख-शांती राहील.

धनु – अपेक्षेप्रमाणे तुम्हाला यश मिळणार नाही. अडथळे येतील. मानसिक ताण येऊ शकतो. निधीची कमतरता असू शकते.

मकर – या राशीसाठी वेळ अनुकूल असू शकेल. नोकरीत प्रत्येकाचे सहकार्य मिळेल. नवीन कामाचे नियोजन केले जाऊ शकते.

कुंभ – अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रेम प्रकरणात यशस्वी होण्याची शक्यता आहे. पैशाबरोबरच तुम्हाला आदर मिळेल.

मीन – तुम्हाला यश मिळेल. आपल्याला आश्चर्यकारक चांगली बातमी मिळेल. लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे, तुम्हाला लाभ मिळेल.

टीप : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

About V Amit