health

डाळिंबाचे साल असे वापरले तर सांधेदुखी ते कैन्सर पर्यंत ठरते फायदेशीर

डाळिंब तसेही आरोग्याच्या दृष्टीने सुपरफूड मानले जाते, पण तुम्हाला माहित आहे का याचे साल देखील तेवढेच फायदेशीर होऊ शकते.

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण काही एंटीऑक्सीडेंट्स आणि मिनरल डाळींबाच्या पेक्षा जास्त त्याच्या साली मध्ये असतात. डाळींबाच्या सालीचे हे गुण तुम्हाला कैन्सर आणि हृदयाच्या गंभीर आजारा पासून वाचवू शकतात. फ्लैवेनॉइन आणि फेनॉलिक्स डाळींबाच्या पेक्षा जास्त साली मध्ये असते. डाळींबाच्या दाण्यामध्ये जेवढे विटामिन सी असते तेवढेच साली मध्ये असते. जर तुम्ही चहा पिण्याचे शौकीन यावेळी ग्रीन टी किंवा लेमन टी एवजी डाळींबाच्या सालीचा आरोग्यदायी चहा बनवा.

डाळींबाच्या सालीचा चहा असा बनवा

डाळींबाच्या सालीचा चहा करण्यासाठी तुम्ही डाळिंबाचे साल धुवून जमा करावेत आणि त्यांना सुकवावेत त्यानंतर मिक्सर मध्ये पावडर तयार करावी. या पावडरीला एका एयरटाइट डब्यात साठवावी. जेव्हाही तुम्हाला डाळींबाच्या सालीचा चहा बनवायचा असेल तेव्हा पाणी गरम करून एक चमचा पावडर टाकावी. यामध्ये तुम्ही लिंबू आणि मध देखील वापरून याची चव वाढवू शकता.

पचनशक्ती वाढ होईल

डाळींबाच्या सालीचा चहा तुम्हाला अनेक प्रकारच्या गंभीर आजारा पासून वाचवते. सोबतच तुमची पचन शक्ती सुधारते. डायरिया मध्ये देखील या चहा मुळे लवकर आराम मिळतो.

हृद्य रोगा पासून सुरक्षा

डाळींबाच्या पेक्षा जास्त फ्लेवेनॉइड्स, फेनॉलिक्स त्याच्या साली मध्ये असते, या सोबतच अनेक एंटीऑक्सीडेंट्स पण या चहा मध्ये असतात. यामुळे ब्लड कोलेस्टेरॉल कमी होतो आणि ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहते.

चेहऱ्याची चमक वाढते

डाळींबाच्या सालीचा चहा पिण्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि तुमचे वय कमी वाटते. याच्या वापरामुळे फ्री रेडीकल्स कमी होतात ज्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग आणि सुरकुत्या नाही होत, सांधेदुखी मध्ये देखील तुम्हाला आराम मिळतो.

कैन्सर पासून संरक्षण

संशोधनात हे समजले आहे कि डाळींबाच्या साली मध्ये काही असे तत्व असतात ज्यामुळे कैन्सर पासून सुरक्षा होते. डाळींबाच्या सालीचा सर्वात जास्त फायदा स्कीन कैन्सर मध्ये होतो. त्यामुळे डाळींबाच्या सालीचा चहा पिऊन तुम्ही कैन्सर पासून संरक्षण मिळवू शकता.


Show More

Related Articles

Back to top button