Breaking News

अमिताभ बच्चन यांचा मित्र म्हणाला मला इग्नोर करत आहेत, त्यास बिग बी दिलेलं उत्तर धक्का देणारे आहे

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. अमिताभ बच्चन यांचे चाहते लहान मुलांपासून ते वयोवृद्ध देखील आहेत. मागील दोन महिन्या पासून अमिताभ बच्चन जास्तच चर्चे मध्ये आहेत. अगोदर ते कोरोना पॉज़िटिव झाल्यामुळे सगळे चिंतीत झाले होते. सोशल मीडियावर त्यांचे  फैन्स अमिताभ यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचे दिसून आले.

सध्या केबीसी ची शू टिंग सुरु झाल्याने अमिताभ बच्चन अत्यंत बिजी झाले आहेत. अमिताभ बच्चन शो सोबतच सोशल मीडियावर देखील एक्टिव असतात. हल्लीच त्यांनी एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये त्यांनी दोन फोटो शेयर केले असल्याचे दिसून येत आहे.

अमिताभ यांची काय होती पोस्ट

या पोस्ट मध्ये अमिताभ यांनी आपल्या एका मित्रा बद्दल सांगितलं आहे या मित्रा ने अमिताभ त्यास इग्नोर करत असल्याचे म्हंटले आहे, ज्याचे उत्तर अमिताभ यांनी एक पोस्ट शेयर करत दिले. या पोस्ट मध्ये बिग बी यांनी आपले दोन फोटो शेयर केले आहेत.

या पोस्ट मध्ये लिहले कि एका मित्रा ने मला असा मेसेज केला. बिग बी लिहितात ‘अमित जी तुम्ही मला इग्नोर करत आहात.’ पुढे अमिताभ लिहितात कि मित्र आहे तर विचार केला उत्तर देऊ, तर मी म्हणालो ‘भैया 12-15 तास काम केल्या नंतर फक्त स्नोरिंग साठी वेळ मिळतो इग्नोरिंग चा नाही.’

बिग बी च्या पोस्ट वर आले 3 लाख लाइक्स

बिग बी च्या या पोस्टला लोकांनी पसंत केले आहे त्यांच्या या पोस्ट वर 3 लाख पेक्षा जास्त लाइक्स आता पर्यंत आले आहेत. जेव्हा पासून शू टिंग सुरु झाली आहे तेव्हा पासून बिग बी कामात खूपच जास्त बिजी झाले आहेत. ते एका दिवसात 15 ते 17 तास शू टिंग करतात. बिग बी वयाच्या 78 व्या वर्षी देखील 15 ते 17 तास काम करतात जे अनेक लोकांना धक्का देणारे ठरू शकते.

About Marathi Gold Team