अमिताभ बच्चन म्हणून बस स्टॉप वर सुंदर मुलींची वाट पाहायचे

महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली मधील आपल्या काही आठवणी सांगितल्या आहेत. जेव्हा ते विद्यार्थी होते आणि सुंदर मुलींच्या सोबत बस मधून प्रवास करत होते. कौन बनेगा करोडपती च्या सीजन ११ मध्ये अमिताभ बच्चन यांनी आपल्या कॉलेज लाइफचा एक किस्सा शेयर केला.

अमिताभ म्हणाले, ‘मी तीन मूर्ती जवळ राहत होतो आणि रोज कॉलेज जाण्यासाठी बस ने प्रवास करत होतो. हि बस संसद आणि सीपी (कनॉट प्लेस) च्या जवळून जात होती आणि पुढे मला माझ्या विशवविद्यालय पर्यंत सोडत होती.’

बिग बी अमिताभ बच्चन यांनी पुढे सांगितले, ‘या मार्गावर विशेषतः सीपी ते आईपी कॉलेज आणि मिरांडा हाउस जाणाऱ्या सुंदर मुली या बस मध्ये येत असत. त्यामुळे मी बस स्टॉप वर थांबत असे आणि यामध्ये सुंदर मुली चढण्याची वाट पाहत असे.’

त्यांनी जुन्या आठवणी शेयर करत सांगितले कि, ‘अनेक वर्षा नंतर जेव्हा मी विश्वविद्यालय कडून स्नातक उपाधी प्राप्त करून नौकरी करणे सुरु केले तेव्हा मी त्या सुंदर महिलां पैकी एकीला भेटलो, जी माझ्या बस मध्ये प्रवास करत होती.’

अमिताभ ने सांगितले कि त्या मुलीने सांगितलं कि कॉलेजच्या त्या दिवसात बस प्रवासा दरम्यान ती देखील त्यांची एक झलक पाहण्याची वाट पाहायची. महिला आपला मित्र प्राण सोबत बस स्टॉप वर उभी राहायची. महिलेने सांगितलं कि जेव्हा बस यायची तेव्हा तिच्या मनात एकच विचार यायचा कि ‘प्राण (तिचा मित्र) जावा पण बच्चन नाही’