Connect with us

एम्बुलेंस गाडी वर AMBULANCE शब्द उलटा का लिहिला असतो? काय आहे याचा उद्देश

Health

एम्बुलेंस गाडी वर AMBULANCE शब्द उलटा का लिहिला असतो? काय आहे याचा उद्देश

एम्बुलेंसचे महत्व आणि गरज याबद्दल आपल्याला माहीती आहे. एम्बुलेंस शरीरावर आलेल्या अति गंभीर संकटा वेळी सर्वांना उपयोगी येते. आपल्याला माहीत असते की एम्बुलेंस मधील रुग्ण हा गंभीर अवस्थेत आहे आणि त्याला त्वरित रुग्णालयात घेऊन जाण्याची गरज आहे. अश्या या गंभीर परस्थितीत एम्बुलेंस सर्वांचे लक्ष स्वताकडे वेधण्यासाठी अनेक प्रयत्न करते ज्यामुळे एम्बुलेंसला इतर लोक आणि वाहने पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देतील अशी अपेक्षा असते ज्यामुळे ती लवकरात लवकर रुग्णालयात किंवा तिच्या इच्छित स्थळी पोहचू शकेल. यासाठी एम्बुलेंस लक्ष वेधण्यासाठी जे प्रयत्न करते त्याचाच एक भाग म्हणजे उलट्या शब्दात लिहिलेला शब्द AMBULANCE. तो उलटा का असतो आणि एम्बुलेंस अजून काय काय गोष्टी लक्ष वेधून घेण्यासाठी करते ते आपण आता पाहू.

लोकांचे लक्ष वेधण्यासाठी एम्बुलेंस करते यागोष्टी

एम्बुलेंस वर उलट्या शब्दात AMBULANCE लिहितात कारण पुढील वाहनाला आरश्यामधून AMBULANCE हा शब्द लगेच वाचता यावा म्हणून कारण आरशा मध्ये सर्व प्रतिबिंब उलटी दिसतात त्यामुळे पहिलेच उलटा लिहिलेत AMBULANCE हा शब्द आरशात सरळ दिसतो. त्यामुळे पुढील वाहन चालकाला समजते की मागे एम्बुलेंस आहे ज्यामुळे तो बाजूला होऊन एम्बुलेंस ला मार्ग मोकळा करून देऊ शकतो.

यासोबत एम्बुलेंस दुसऱ्या ट्रिक वापरते त्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक सायरन, फ्लैशिंग लाइट, स्पीकर, रेडियों फोन इत्यादी ज्यामुळे ती सर्वांचे लक्ष लवकरात लवकर वेधून घेऊ शकते.

भडक रंग

एम्बुलेंस लोकांच्या नजरेत पटकन यावी यासाठी तिला भडक आणि चमकदार रंग दिला जातो ज्यामुळे लोक लगेच तिला ओळखून पुढे जाण्यासाठी मार्ग देतील. असे गरजेचे नाही की एम्बुलेंसचा रंग लाल आणि निळाच असेल. पिवळा, हिरवा, केसरी आणि इतर रंगामध्ये एम्बुलेंस जगभरात पाहण्यास मिळतात यासर्वांचा एकच उद्देश असतो तो म्हणजे लोकांचे लक्ष वेधायचे ज्यामुळे लोक लगेच पुढे जाण्यासाठी रस्ता देतील आणि एम्बुलेंस वेळेवर पोहचेल.

तुमच्या माहीतीसाठी सांगू इच्छितो एम्बुलेंस फक्त मोटरगाडीच नसते तर एयर एम्बुलेंस, हेलिकॉप्टर, पाण्यातील जहाज, घोडागाडी, मोटार सायकल किंवा सायकल सुध्दा असू शकते. यासर्वांचा एकच उद्देश जलद रुग्ण सेवा.

कदाचित वरील सर्व माहीती तुम्हाला अगोदरच माहीत असेल पण आपल्या समाजात अजून असे भरपूर लोक आहेत ज्यांना हे माहीत नाही त्यामुळेच तर एम्बुलेंसला पुढे जाण्यासाठी जलद मार्ग मिळत नाही. त्यामुळे ही माहीती सर्वांना समजण्यासाठी हा लेख शेअर करा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top