viral

सिलिका जेल चे असे 9 वापर ज्याबद्दल तुम्हाला कल्पना देखील नसेल

जेव्हा पण आपण शॉपिंग करून येतो तेव्हा आपल्याला नवीन पर्स, बैग, बूट इत्यादी मध्ये छोटे छोटे पैकेट पाहण्यास मिळतात. कधी तुम्ही याचा विचार केला आहे का या पैकेट चा उपयोग काय आहे? यांच्या बद्दल माहिती नसल्यामुळे अनेक लोक हे पैकेट फेकून देतात. पण जर तुम्ही होम डेकॉरचे मेगजीन किंवा वेबसाईट पाहिली तर तेथे सिलिका जेल च्या या पैकेट च्या वापराच्या विविध पध्द्ती मिळतील.

सिलिका जेल तुमची अनेक पध्द्तीने मदत करू शकतो. हे एक स्ट्रॉंग अवशोषक आहे आणि यामुळे हे हवेत असलेली आद्रता म्हणजेच ओलावा लवकर शोषून घेतो. जेव्हा याचा वापर करायचा नसेल तेव्हा यास एखाद्या कंटेनर किंवा वार्डरॉब मध्ये ठेवावे.

पाळीव प्राण्यांना या पासून काहीही अपाय नाही आहे पण माणसांसाठी हे ठीक नाही आहे. यास लहान मुलांपासून दूर ठेवावे.

या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेऊ सिलिका जेल कोणकोणत्या पध्द्तीने आपली मदत करू शकते.

महत्वाच्या कागदपत्राचे करतो रक्षण

आपली कपाटामध्ये जेथे महत्वाची कागदपत्रे जसे कि पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट किंवा लग्नाच्या रजिस्ट्रेशन चे पेपर, गाडीची कागद पत्रे इत्यादी ठेवली आहेत तेथे थोडे सिलिका जेल ठेवा. हे त्या डॉक्युमेंट्स ला कोरडे ठेवेल आणि बैक्टीरिया पासून सुरक्षित देखील ठेवेल.

कैमरा ठेवेल ड्राय

हा घरामध्ये सिलिका जेल वापरण्याचा सर्वोत्तम प्रकार आहे. कैमराच्या लेंस वर अनके वेळा फॉग सारख जमा होत आणि हे कैमेराला लवकर खराब करतो. अनेक वेळा अशी स्थिती पाण्याच्या आतमध्ये वापरल्या जाऊ शकणाऱ्या कॅमऱ्यात देखील होते. जर तुम्ही आपल्या कैमरा केस मध्ये सिलिका जेल ठेवले तर ते त्यास ड्राय ठेवेल.

कपड्यांना ओलसरपणा येऊ देत नाही

थंडीचा काळ संपल्या नंतर भारी भरकम स्वेटर आणि जैकेत परत सांभाळावे लागतात. असे करताना त्यामध्ये ओलसरपणा येतो आणि जेव्हा पुन्हा त्यांना वापरण्यासाठी आपण काढतो तेव्हा त्यामधून दुर्गंध देखील येऊ लागतो. त्यामुळे असे कपडे सांभाळून ठेवताना त्यांच्या खिशामध्ये किंवा आजूबाजूला 2-3 सिलिका जेल चे पैकेट ठेवा. ज्यामुळे तुमचे विंटरवियर कोणत्याही दुर्गंधी शिवाय तुम्हाला फ्रेश मिळतील.

ओल्या झालेल्या फोनला वाचवतो

हा सिलिका जेलचा अत्यंत उपयोगी उपाय आहे. काही लोकांच्या बाबतीत असे होते कि त्यांचा फोन पूल, बाथिंग टब किंवा इतर ठिकाणी पाण्या मध्ये पडतो किंवा त्यावर पाणी सांडते. अश्या स्थिती मध्ये घाबरण्याचे कारण नाही. फोन मधून बैटरी आणि मेमोरि कार्ड काढा आणि त्यास एका बाउल मध्ये ठेवा ज्यामध्ये अनेक सिलिका जेल चे पैकेट असतील.

पुस्तके आणि फोटो अल्बमची घेतो काळजी

पुस्तके आणि अल्बम मध्ये लवकरच किडे आणि बुरशी यांचा प्रभाव दिसून येतो, यामुळे ते पिवळे देखील दिसू लागतात. तुम्ही फक्त पुस्तके आणि अल्बम मध्ये सिलिका जेल चे पैकेट ठेवा. जर पुस्तक ओलसर असतील तर त्यांना पूर्वी उन्हात कोरडी करा आणि त्यानंतर सिलिका जेल त्यामध्ये ठेवा.

रेजर ब्लेड चे आयुष्य वाढवतो

घरामध्ये रेजर ब्लेड ला गंज लागण्या पासून वाचवणे कठीण असते. एका कंटेनरला सिलिका जेल ने भरा. शेविंग नंतर ब्लेड सिलिका जेल सोबत ठेवा ज्यामुळे ते व्यवस्थित कोरडे होतील. जर तुम्हाला दीर्घकाळ ब्लेड साठवून ठेवायचे असतील तर त्यांच्या सोबत सिलिका जेल चे पैकेटस ठेवा.

फ्रिजच्या आत आइसिंग थांबवा

जेव्हा तुम्ही फ्रिज मध्ये काही सामान ठेवता तेव्हा त्यावर बर्फ जमा होते. असे होण्या पासून थांबवण्यासाठी एका बाउल मध्ये सिलिका बीड्स किंवा सिलिका जेल पैकेट टाकून फ्रिज मध्ये ठेवा. हे भाज्यांमध्ये मॉइश्चर येण्या पासून रक्षण करेल.

ज्वेलरी ठेवेल सुरक्षित

हवेत असलेल्या मॉइश्चरमुळे आपल्या ज्वेलरी विशेषतः चांदीच्या ज्वेलरी काळ्या पडतात. जर आपण आपल्या ज्वेलरी बॉक्स मध्ये सिलिका जेल पैकेट ठेवले तर ज्वेलरी चमकदार राहील आणि मॉइश्चर पासून सुरक्षित राहील.

रूम फ्रेशनर प्रमाणे करा वापर

सिलिका जेलच्या या उपयोगास दुर्लक्षित करणे कठीण आहे. आपला आवडता एसेन्शियल ऑईल घ्या आणि त्यामध्ये सिलिका बीड्स टाका. हे एका उत्तम रूम फ्रेशनर प्रमाणे काम करेल.


Show More

Related Articles

Back to top button