Connect with us

पीएम मोदींच्या बॉडीगार्डसच्या हातात ब्रीफकेस का असते माहित आहे का

People

पीएम मोदींच्या बॉडीगार्डसच्या हातात ब्रीफकेस का असते माहित आहे का

तुम्ही नेहमी पाहिले असेल की जेव्हापण पीएम नरेंद्र मोदी कोणत्याही कार्यक्रमाला जातात किंवा विदेश दौऱ्यावर असतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या बॉडीगार्डसच्या हातात एक ब्रीफकेस असते. पण तुम्हाला माहीत आहे का या ब्रीफकेसचे रहस्य? काय असते या ब्रीफकेस मध्ये? का एवढी महत्वाची आहे ही ब्रीफकेस?

पीएम च्या सुरक्षेची जबाबदारी SPG कडे असते, SPG कमांडो फक्त पीएमचीच नाहीतर त्यांच्या परिवाराची पण सुरक्षा करतात. या SPG कमांडो कडे नेहमी एक ब्रीफकेस असते, जी अत्यंत महत्वाची असते.

पीएम देश विदेशात कोठेही गेलेतरी SPG कमांडो त्यांच्या सोबत असतात आणि अत्यंत सतर्क राहून त्यांचे संरक्षण करतात. याचाच एक भाग म्हणून ही ब्रीफकेस त्यांच्या सोबत असते. पीएम च्या सुरक्षेसाठी अनेक पद्धती वापरल्या जातात त्यातीलच ही एक पद्धत असते. चला पाहू का ही ब्रीफकेस महत्वाची आहे.

खरेतर ही छोटीशी दिसणारी ब्रीफकेस पीएम चे कोणत्याही खतरनाक हमल्या पासून संरक्षण करण्यासाठी असते. ही ब्रीफकेस हमाल्याच्या वेळी एका झटक्यात एवढी मोठी करता येते की पीएमना ब्रीफकेसच्या आड संपूर्ण झाकले जाऊ शकेल. ही ब्रीफकेस बुलेटप्रुफ असते यामुळे कोणत्याही जीवघेण्या गोळी पासून त्यांचे संरक्षण होते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top