foodhealth

7 दिवस दुधा मध्ये हळद टाकून पिण्यामुळे जे फायदे मिळतात, त्याचा विचार तुम्ही स्वप्नात देखील केला नसेल

आज आम्ही तुम्हाला दुधात हळद मिक्स करून पिण्याचे फायदे काय असतात या बद्दल माहीती देणार आहोत. भारतामध्ये हळद प्रत्येक स्वयंपाकघरात असतेच. हळदीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ म्हणून करतो. पण आपल्याला हे माहीत नाही की जर हळद दुधा मध्ये टाकून पिण्यामुळे मिळणारे फायदे हे एखाद्या औषधी प्रमाणे आहेत. फक्त 7 दिवस हळद दुधात मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला चमत्कारीक फायदे मिळतील ज्याचा विचार तुम्ही स्वप्नात देखील केला नसेल.

आयुर्वेद मध्ये हळद ही एक उत्तम एंटीबायोटीक असल्याचे मानले गेले आहे. यामुळे हळद स्कीन, पोटाचे विकार, शरीराचे अनेक रोगांच्या उपचारासाठी वापरली जाते. हे तर झाले हळदीच्या गुणांची माहीती पण दुध पण नैसर्गिक प्रतिजैविक आहे. हे शरीराच्या नैसर्गिक संक्रमणाला थांबवते. हळद आणि दुध दोन्हीही गुणकारी आहे. पण जर यादोन्ही वस्तू एकत्र घेतल्यामुळे यांचे फायदे दुप्पट होतात. यांना एकत्र पिण्यामुळे आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. हळद आणि दुध यांच्या फायद्यामुळे यास गोल्डन मिल्क असे म्हंटले जाते. चला पाहू याचे फायदे.

हळद आणि दुध एकत्र पिण्याचे फायदे

हाडे करतो मजबूत : रोज हळदीचे दुध पिण्यामुळे शरीराला आवश्यक तेवढे कैल्शियम मिळते. हाडे निरोगी आणि मजबूत राहतात. हे सांध्यांना आणि पेशींना लवचिक बनवतात ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

संधीवात मध्ये फायदेशीर : हळदीवाले दुध संधीवात मध्ये देखील फायदेशीर आहे. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

टॉक्सिन्स दूर करतात : हळदीचे दुध रक्तातील टॉक्सिन्स दूर करतात आणि लिवर स्वच्छ करते. पोटा संबंधीच्या समस्ये मध्ये फायदेशीर आहे.

किमोथेरेपीच्या वाईट प्रभावाला कमी करतात : एका शोधा अनुसार हळदीत असलेले तत्व कैंसर कोशिका पासून  डीएनए वर होणाऱ्या नुकसाना पासून वाचवतात आणि किमोथेरेपीचे दुष्प्रभाव कमी करतात.

कानदुखी मध्ये आराम : हळदीच्या दुधामुळे कानदुखी मध्ये आराम मिळतो. यामुल्र शरीराचा रक्त संचार वाढतो. ज्यामुळे वेदना वेगाने कमी होतात.

चेहरा चमकवणण्यात सहाय्य : रोज हळदीचे दुध पिण्यामुळे चेहरा चमकायला लागतो. हळदीचे दुध कापसाने चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचेची लाली आणि डाग कमी होतात. सोबतच चेहऱ्यावर चमक येते.

ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होते : आयुर्वेद मध्ये हळदीला रक्तशुद्ध करणारे मानले गेले आहे. हे शरीराच्या ब्लड सर्कुलेशन मजबूत करते. हे रक्ताला पातळ करणारा आणि लिम्फ तंत्र आणि रक्त वाहिन्यातील घाण साफ करणारे असते.

वजन कमी करते : रोज एक ग्लास दुधा मध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून पिण्यामुळे शरीर सुडौल होते. कारण कोमट दुधात हळद मिक्स करून पिण्यामुळे शरीरातील जमा झालेले फैट कमी होते. यामध्ये असलेले कैल्शियम आणि इतर तत्व नैसर्गिक पद्धतीने वेट लॉस करण्यास मदत करतात.

स्कीन प्रॉब्लेम मध्ये रामबाण उपाय : हळदीचे दुध स्कीन प्रॉब्लेम मध्ये रामबाण उपाय आहे.

लिवर मजबूत बनते : हळदीचे दुध लिवर मजबूत करते. हे लिवरच्या संबंधीत आजारा पासून शरीराचे संरक्षण करते आणि लिम्फ तंत्र स्वच्छ करते.

अल्सर बरे करते : हे एक शक्तिशाली एंटीसेफ्टीक बनते आणि आतडे निरोगी बनवण्या सोबत पोटाचा अल्सर आणि कोलाइटीसचा उपचार करते. यामुळे पचन चांगले होते. यामुळे अल्सर, डायरिया आणि अपचन होत नाही.

मासिक धर्मात होणाऱ्या वेदनेत आराम : हळदीचे दुध मासिकधर्मात होणाऱ्या वेदनेमध्ये आराम देते.

सर्दी खोकाल्यामध्ये आराम : सर्दी खोकाल्यामध्ये आराम देण्यात हळद आणि दुध हा रामबाण उपाय आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : रात्री झोपताना फक्त लिंबू जवळ ठेवण्यामुळे आरोग्याला मिळतात जादुई फायदे जे तुम्हाला थक्क करतील


Show More

Related Articles

Back to top button