Connect with us

10 बॉलीवूड सिलेब्रेटी झाले आहेत Fat To Fit, पहा यासाठी त्यांनी काय केले

Celebrities

10 बॉलीवूड सिलेब्रेटी झाले आहेत Fat To Fit, पहा यासाठी त्यांनी काय केले

प्रत्येक व्यक्तीला वाटते की त्याने वजन कमी करावे आणि सुडौल शरीर मिळवावे. पण हे प्रत्येकाला जमतेच असे नाही परंतु बॉलीवूड मध्ये असलेल्या या 10 सेलिब्रिटीजनी आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने हे करून दाखवले आहे. या मध्ये पुरुष अभिनेत्या मध्ये अर्जुन कपूरचे नाव प्रामुख्याने घेतले पाहिजे तर अभिनेत्री मध्ये आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा.

ही आहे संपूर्ण 10 बॉलीवूड सेलिब्रिटीजची लिस्ट ज्यांनी आपले वाढलेले वजन कमी केले आहे आणि फिट बॉडी मिळवली आहे.

#1 सोनम कपूर

तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही की सोनम कपूरचे वजन तिने पहिली फिल्म करण्याच्या अगोदर 86 किलो होते. परंतु तिने strict diet केले, जास्त प्रोटीन आणि दिवसातून 5 वेळा थोड्याथोड्या प्रमाणात खाण्याची सवय लावून घेतली. या सवयींमुळे तिने 30 किलो वजन कमी केले.

#2 सोनाक्षी सिन्हा

ही साईज झिरो नाही, पण फिट राहण्याचा तिचा उद्देश होता. हिचे वजन 90 किलो पेक्षा जास्त होते. तिने जवळपास 30 किलो वजन कमी केले बॉलीवूड मध्ये एन्ट्री करण्या अगोदर. तिच्या या मेहनती मधून तुम्ही देखील प्रेरणा घेऊ शकता.

#3 अलीया भट्ट

अलीयाची निवड तिच्या पहिल्या चित्रपटासाठी हजारो मुलींमधून करण्यात आली होती ज्या ओडीशन देण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी करण जोहरने अलीयास वजन कमी करण्यास सांगितले त्यामुळे तिने आपले वजन कमी केले जे तेव्हा 68 किलो होते. अलीयाने आपले 16 किलो वजन कमी करून पहिला चित्रपट केला.

#4 काजोल

काजोलने आपले वजन एका महिन्यात 18 किलो कमी केले होते. यासाठी तिने आपल्या strict diet plans फॉलो केले आणि जिद्दीने आपले वजन कमी केले.

#5 अर्जुन कपूर

बॉलीवूड मधील फिट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अर्जुन कपूर ने आपले वजन 140 किलो वरून कमी केले आहे आणि तो आता एक चांगली बोडी मेंटेन करत आहे. यासाठी त्याने कठोर मेहनत केली आहे. यासाठी त्याने व्यायाम आणि आहार यावर व्यवस्थित लक्ष दिले.

#6 परिणीती चोप्रा

अनेक लोक तिला नेहमी तिच्या जास्त वजनामुळे बोलत असत. खाण्याची चाहती असलेली परिणीतीने आपले वजन कमी केले आहे. तिने 86 वरून 56 किलो पर्यंत आपले वजन कमी केले आहे.

#7 करीना कपूर-खान

बॉलीवूडची साईज झिरो अभिनेत्रीचे वजन आई झाल्यामुळे वाढले आहे पण तिने आपल्या टशन चित्रपटासाठी मेहनत करून साईज झिरो बॉडी बनवली होती.

#8 अदनान सामी

एक वेळ अशी पण होती जेव्हा अदनान आपल्या वाढलेल्या वजनामुळे wheelchair वर होता. परंतु त्याने जे काही केले त्यामुळे संपूर्ण जगाला त्याने सुखद धक्का दिला. त्याने 130 किलो पेक्षा जास्त वजन कमी केले आणि तेही फक्त एका वर्षा मध्ये.

#9 जैकी भगनानी

पहिला चित्रपट करण्याच्या अगोदर याचे वजन 130 किलो होते. पण आहार आणि व्यायाम योग्य प्रकारे करून त्याने आपले वजन दोन वर्षात 60 किलोने कमी केले.

#10 झरीन खान

मेडिया आणि लोकांनी जास्त वजनामुळे टीका केल्यानंतर हिने आपले वजन 100 किलो वरून 57 किलो केले होते. म्हणजेच जवळपास अर्धे वजन कमी केले. त्यामुळे हे सिद्ध होते की जेथे इच्छा असेल तेथे मार्ग सापडतोच.

तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये लिहा आणि पोस्ट आवडली असेल तर लाईक आणि शेयर करा.

अश्याच मनोरंजक आणि ज्ञान वाढवणाऱ्या पोस्टस वाचण्यासाठी facebook.com/marathigold हे आमचे पेज लाईक करा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top