Entertenment
तरुण मुली महिला आणि क्रिकेटर सुध्दा फोटो मधल्या या मुलाच्या प्रेमात का पडत आहे, कोण आहे हा??
वरील फोटो मध्ये जो मुलगा आहे त्याला तुम्ही सोशल मेडियावर अनेक वेळा पाहिले असेल. दर वेळेला त्याच्या सोबत एक नवीन मुलगीही सोबत असल्याचे कदाचित तुम्ही पाहिले असेल आणि मनामध्ये विचार देखील केला असेल की हा साधारण दिसणारा मुलगा प्रत्येक वेळी सुंदर सुंदर मुलींच्या सोबत कसा असतो. काय जादू आहे याच्याकडे जी आपल्याकडे नाही.तर त्याच्या या जादूचे रहस्य आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हा फोटो मधला मुलगा कोण आहे तो काय करतो हे देखील आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला तर पाहू हा तीस्मार आहे तरी कोण.
फोटो मधला हा मुलगा बांग्लादेशी फिल्म मध्ये हिरोचे काम करतो. तो बांग्लादेश मध्ये अत्यंत प्रसिध्द आहे, तो तेथील सुपरस्टार आहे म्हणजेच तो तेथील शाहरुख खान आहे असे बोलल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्याच्या सोबत एक सेल्फी काढण्यासाठी मुली जीव ओवाळून टाकण्यास तयार असतात.
या हिरोचे (याला हिरो बोलणे यापेक्षा मोठा जोक नसेल) नाव अलोम आहे. याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून येऊ शकतो की क्रिकेटर देखील याच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी आतूर असतात.
अलोमच्या पूर्वायुष्या बद्दल सांगायचे झालेतर तो अत्यंत गरीब होता त्याच्याकडे जेवणाचे देखील पैसे नसायचे आणि पोट भरण्यासाठी तो चने विकण्याचे काम करत असे. पण त्याची जिद्द आणि यशस्वी होण्याचे ध्येय त्याला पुढे घेऊन गेले. त्याची हिरो बनण्याची तीव्र इच्छा होती त्यासाठी त्याने स्वताचे म्युजिक कंपोज केले आणि केबल टीव्हीवर रिलीज केले आणि त्यानंतर तो सतत यशस्वी होत गेला.
अलोम ने दिलेल्या एका मुलाखती मध्ये त्याने सांगितले की त्याचा चेहरा पाहून कोणतीही सुंदर महिला त्याच्या सोबत काम करण्यास तयार होत नव्हती.
पण आज वेळ बदलली आहे. आज प्रत्येक व्यक्ती त्याच्या सोबत काम करू इच्छित आहे. आज आलम ज्या स्तरावर पोचला आहे त्यामागे त्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत आहे.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका
