Connect with us

कोरफडीचे औषधी गुण आणि फायदे

Health

कोरफडीचे औषधी गुण आणि फायदे

एलोवेरा म्हणजेच कोरफड एक अशी वनस्पती आहे जिचा वापर प्राचीनकाळा पासून केला जात आहे. औषधी गुणांचा भंडार असल्यामुळे आता एलोवेराच्या रोपट्याची डिमांड वाढलेली आहे. एलोवेरा मध्ये अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ जसे कि एमिनो एसिड, विटामिन्स, खनिज तत्व आणि इतर उपयोगी तत्व असतात. दिसण्यास या वनस्पतीची पाने हलक्या हिरव्या रंगाची आणि काटेदार असतात. भारता मध्ये एलोवेराला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे घृतकुमारी किंवा गवारपाठा आणि मराठी मध्ये कोरफड. आज आम्ही तुम्हाला एलोवेराचे औषधी गुण, लाभ.

परंतु याआधी तुम्हाला सांगू इच्छितो कि एलोवेरा भारता मध्येच नाही तर अमेरिका आणि चीन सारख्या देशात देखील ब्युटी प्रोडक्ट्स आणि औषधा मध्ये वापरला जातो. वजन कमी करणे असो किंवा शरीराची इम्युनिटी वाढवणे असो, एलोवेरा हा एकमेव उत्तम उपाय आहे. एलोवेरा उगवणे अगदी सोप्पे आहे. काही लोक यास सजावट म्हणून घरामध्ये लावतात.

एलोवेराचे फायदे – कोरफड उपाय किंवा फायदे

एलोवेरा मधील सर्वात महत्वाचा हिस्सा त्याचा रस मानला जातो. खरतर एलोवेराच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आणि औषधी गुण असतात. जे अनेक आजाराला मुळासकट दूर करतात. एलोवेराच्या रसाला एलो जेल किंवा एलोवेरा ज्यूस म्हणतात. चला पाहू याचे कोणकोणते फायदे आहेत.

हृद्य रोग

एलोवेराचा रस हृद्य रोगावर अमृत आहे. खरतर शरीरामध्ये सतत वाढणाऱ्या कोलेस्टेरॉल आणि वजनास थांबवणे आणि रक्त प्रवाह सुरळीत करून आपल्याला हृद्य रोगा पासून वाचवतो. एवढेच नाही तर एलोवेरा ज्यूस मध्ये शरीरामध्ये भोजनाच्या सोबत जाणारे विशाक्त पदार्थ बाहेर काढण्याची क्षमता असते. यासाठी तुम्ही हा ज्यूस दररोज 20-30 ml पाण्यामध्ये मिक्स करून सेवन करावे.

केसांसाठी

बहुतेक मुलांना आणि मुलींना केस गळण्याचा त्रास असतो. पण जर तुम्ही केसांवर एलोवेरा ज्यूस लावला तर केसांना मजबुती मिळते, घनदाट आणि मजबूत काळे केस मिळतात. याच सोबत हे डोक्यामध्ये कोंडा आणि उवांचा नाश करतो.

सर्दी-खोकला

जर तुम्हाला सर्दी खोकला झालेला असेल तर एलोवेरा ज्यूस तुमच्यासाठी फायदेशीर होऊ शकतो. यासाठी तुम्ही एलोवेराच्या पानांना भाजून त्यांचा रस व्यवस्थित काढावा आणि अर्धा चमचा रस कोमट पाण्यात मिक्स करून प्यावा. असे केल्यामुळे लघवी संबंधित आजार देखील दूर होतात.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top