astrology

अक्षय तृतीया वर राशी अनुसार करा हे उपाय, घरामध्ये कधी होणार नाही धनाची कमी

जसेकी आपल्या सर्वांना माहीत आहे यावर्षी अक्षय तृतीया 18 एप्रिल रोजी आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त मानला जातो. यादिवशी कोणतेही काम सुरु करण्यासाठी त्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची आवश्यकता नसते. यादिवशी प्रत्येक काम शुभ मानले जाते आणि यादिवशी सुरु केलेले काम यशस्वी होऊ शकते. आज आम्ही या आर्टिकल मध्ये आपल्या राशी अनुसार काही असे उपाय सांगत आहोत ज्यांना केल्याने तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि तुम्हाला पैश्यांची कमी होणार नाही.

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी जातकाने माता लक्ष्मीला लाळ कपड्या सोबत सव्वा किलो लाडू अर्पित केले पाहिजेत.

शुक्र ग्रह हा वृषभ राशीचा स्वामी आहे. अक्षय तृतीयाच्या दिवसावर या लोकांना धनलाभ होण्यासाठी आणि शनीच्या क्रोधा पासून वाचण्यासाठी एका कळसामध्ये जल भरून दान केले पाहिजे.

मिथुन राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी मुंग डाळीचे दान केले पाहिजे. असे केल्याने त्यांच्या घरात सुख समृद्धी आणि धन वाढेल.

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या दिवशी चांदीच्या अंगठी मध्ये मोती’ धारण केला पाहिजे. यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.

 

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी सकाळी सर्वात पहिले उगवत्या सूर्याला जल अर्पण केले पाहिजे आणि सोबतच यादिवशी त्यांनी गुळाचे दान केले पाहिजे.

कन्या राशीचा स्वामी बुध आहे. यादिवशी तुम्ही कपड्याचे दान केले पाहिजे आणि घरात सफेद रंगाची माता स्थापित केली पाहिजे.

शुक्र ग्रह हा तुला राशीचा स्वामी आहे. यादिवशी त्यांनी पन्ना धारण केला पाहिजे असे केल्याने त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते.

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. यादिवशी पोवळे धारण केले पाहिजे आणि सोबतच कपडे आणि फळाचे दान केले पाहिजे.

धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. यादिवशी तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये हळद लपेटून पूजेच्या जागी ठेवले पाहिजे आणि कोणत्याही पिवळ्या वस्तूचे दान केले पाहिजे.

मकर राशीचा स्वामी शनी आहे. यादिवशी तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये तिळाचे तेल भरून काळ्या कपड्यात लपेटून घराच्या पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवले पाहिजे असे केल्यामुळे धनलाभ होण्या सोबतच चांगले भाग्य प्राप्ती होईल.

कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. यादिवशी तुम्ही तीळ, लोखंड, नारळ इत्यादी दान केले पाहिजे. असे केल्यामुळे धन प्राप्ती होईल.

मीन राशीचा स्वामी गुरु आहे. तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये पिवळे फुल बांधून घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवले पाहिजे. हा उपाय केल्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल आणि धन प्राप्ती होईल.


Show More

Related Articles

Back to top button