Connect with us

अक्षय तृतीयाच्या दिवशी चुकूनही करू नका हे काम, अन्यथा माता लक्ष्मी कायमची होईल रुष्ट

Astrology

अक्षय तृतीयाच्या दिवशी चुकूनही करू नका हे काम, अन्यथा माता लक्ष्मी कायमची होईल रुष्ट

या वर्षी 18 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे हे कदाचित तुम्हाला एवढ्याला माहीत झाले असेलच. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाचे आपले महत्व असते त्याच प्रमाणे अक्षय तृतीयाचे देखील महत्व आहे. यादिवशी केलेले कोणतेही काम पूर्णत्वास जाते असे मानले जाते. हा दिवस एक शुभ मुहूर्त आहे यादिवशी कोणतेही काम सुरु करण्यासाठी वेगळा मुहूर्त काढण्याची आवश्यकता नसते.

पौराणिक मान्यता आहे की यादिवशी केलेले पुण्य कर्म अक्षय असते म्हणजेच कायमस्वरूपी असते. तसेच हा दिवस माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. यादिवशी माता आपल्या भक्तांवर विशेष कृपा करते. आपल्या राशीनुसार कोणते कार्य केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल हे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. परंतु त्याआधी अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणती कामे करू नये हे आपण आज येथे पाहू. कारण जर तुम्ही ही कामे केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होण्याच्या एवजी रुष्ट होईल.

अक्षय तृतीया वर राशी अनुसार करा हे उपाय, घरामध्ये कधी होणार नाही धनाची कमी

अंघोळ न करता तुळशीला स्पर्श करू नका

खरेतर अक्षय तृतीयाच्या दिवशी तुळशीची पूजा केली जाते. शास्त्राच्या अनुसार तुळशी भगवान विष्णूला विशेष प्रिय आहे. त्यामुळे स्नान न करता तुळशीला स्पर्श करू नका.

अस्वच्छता ठेवू नका

माता लक्ष्मीला स्वच्छता जास्त आवडते. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची आराधना करणार असतो त्यामुळे साफसफाई कडे विशेष लक्ष द्यावे. अस्वच्छता ठेवू नये. खास करून पुजेच्या वेळी स्वच्छता ठेवावी.

महिलांचा अपमान करू नका

महिला आणि कन्याया माता लक्ष्मीचे रुप मानले जाते. त्यामुळे जो व्यक्ती देवाची पूजा मनोभावे करतो परंतु स्त्रियांचा आदर ठेवत नाही त्यांना अपमानित कातो, त्याच्यावर माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे या दिवशी पूजा करण्याच्या अगोदर घरातील सर्व महिलांच्या बद्दल तुमच्या मनामध्ये आदरभाव असणे आवश्यक आहे.

मनामध्ये नकारात्मक भाव ठेवू नका

अक्षय तृतीय पुण्य कमावण्याचा दिवस असतो यादिवशी शक्य तेवढे दानधर्म करावे आणि दुसऱ्याच्या हिताचा विचार करावा. त्यामुळे दुसऱ्या बद्दल नकारात्मक विचार आणि द्वेष इर्ष्या ठेवू नये.

कोणत्याही याचकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नका

अक्षय तृतीया पुण्य कमावण्याचा दिवस असल्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे दान करावे त्याच्या अनेक पटीने तुम्हाला पुण्य आणि लाभ मिळतील. त्यामुळे यादिवशी यथाशक्ती गरीब आणि गरजू लोकांना दान करावे आणि कोणत्याही याचकाची म्हणजेच मागणाऱ्याचे हात रिकामे ठेवून त्यास परत पाठवू नये.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top