103 शहीद जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमार ने दिले दिवाळी गिफ्ट, जाणून घ्या किती रुपयाचे चेक पाठवले आणि चिठ्ठी मध्ये काय लिहिले

बॉलीवूडचे काही कलाकारांना सामान्य लोकांची काळजी आहे आणि विशेषतः त्यालोकांच्या बद्दल ते विचार करतात जे सीमेवर आपल्या कुटुंबियांच्या पासून दूर राहतात किंवा शाहिद झाल्याने कुटुंबियांना एकटे सोडून गेले आहेत. शहीदांच्या कुटुंबीयांची दिवाळी कशी साजरी होईल याचा विचार अक्षय कुमार ने केला आणि त्याने 103 शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिवाळी गिफ्ट पाठवलं आहे आणि सोबत एक चिठ्ठी लिहिली आहे.

दिवाळी निमित्त अक्षय कुमार ने शहीद जवानाच्या बलिदानाला सलाम आणि त्यांच्या बद्दलची आस्था म्हणून 103 जवानांच्या कुटुंबियांना 25-25 हजार रुपयाचा चेक पाठवला आहे. मीडिया रिपोर्ट्स अनुसार 25 हजाराचा चेक, मिठाई आणि चिठ्ठी पाठवली आहे.

खरंतर एका आयपीएस ऑफिसरला दिवाळी निमित्त शहीद जवानांच्या कुटुंबियांना मिठाई पाठवण्याची आयडिया आली, ज्या अनुसार 103 शहीद जवानांच्या कुटुंबीयांची लिस्ट तयार केली गेली आणि ऑफिसरची हि आयडिया अक्षय कुमार ला आवडली आणि त्याने मिठाई सोबत 25 हजाराचा चेक आणि एक शुभेच्छा देणारे पत्र लिहिले.

अक्षय कुमार ने चिठ्ठी मध्ये लिहिले आहे

अक्षय ने आपल्या चिठ्ठी मध्ये लिहिले आहे, “आपल्या घरा मधील शूर शहीद वीराने देशाला दिलेले बलिदान हे सर्वोच्च आहे. आम्हा सगळ्या भारतीय लोकांना या सुपुत्रा बद्दल सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की या दिवाळीच्या प्रसंगी आपण आपल्या सुपुत्राच्या आठवणीला आणि सानिध्याला उजाळा देत असाल.”

चिठ्ठी मध्ये पुढे लिहिले आहे, “आपल्यावर कोसळलेलं दुःख अपार आणि कठोर आहे. पण यामधून आपण सावरून धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.” अक्षय कुमार पुढे लिहितो, “मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई आणि त्यांच्या पुस्तकांसाठी लहानशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, अशी माही नम्र विनंती.”