People

सामान्य नागरिकांना मोठा धक्का, मोदी सरकारने घेतला एसी बद्दल मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णया नंतर आता केंद्रीय उर्जा मंत्रालय सर्व सामान्य लोकांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. एअर कंडीशनरच्या किमान तापमानावर मर्यादा लावण्याचा निर्णय केंद्रीय उर्जा मंत्रालयाने घेतला आहे. तुम्हाला यापुढे एसी 24 अंशांच्या खाली सेट करता येणार नाही. कारण एसी बनवणाऱ्या कंपन्यांनाच डिफोल्ट सेटिंग 24 अंशावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीच्या काळात हा निर्णय प्रायोगित तत्वावर 4 ते 5 महिने राबवला जाणार आहे. त्याच्या नंतर संपूर्ण देशभर हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

यामुळे होईल 20 अब्ज युनिट वीज बचत

आपल्या शरीराचे तापमान 36 ते 36 अंशावर असते. परंतु बहुतेक हॉटेल आणि ऑफिस मध्ये एसी 18 ते 21 अंशावर सेट केला जातो. यामुळे अतिरिक्त वीज लागते आणि याचा वाईट परिणाम आरोग्यावर देखील होतो. असे होऊ नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देशामध्ये 20 अब्ज युनिट विजेची बचत होईल असा दावा करण्यात येत आहे.

Tags
Show More

Related Articles

3 Comments

    1. पूर्वी सारखे फक्त श्रीमंत लोकच नाही आता एसी वापरत. आजकाल सामान्य लोक देखील एसी वापरतात त्यामुळे सामान्य नागरिकांना धक्का.. 🙂

  1. It’s a good decision by Modi govt infact.. eventually it’s saving the electricity.

Back to top button