People

पुलवामा हल्ल्या बद्दल पाकिस्तान आणि जैश वर जोरदार टीका केली असदुद्दीन ओवैसी यांनी, इमरान ला दिला निरागस पणाचा मुखवटा काढण्याचा सल्ला

पुलवामा मध्ये CRPF च्या ताफ्यावर झालेल्या आतंकवादी हल्ल्या बद्दल AIMIM (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लमीन ) चे नेता असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी पाकिस्तान वर आगपाखड केली. आतंकवादाच्या मुद्द्यावर त्यांनी पाकिस्तानी मुख्यमंत्री इमरान खानला ‘शराफत का नकाब हटाओ’ असा सल्ला दिला तसेच पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश-ए-मोहम्मद ला ‘जैश-ए-शेतान’ संबोधले आहे. ओवेसी यांनी या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला मौलाना नाही तर ‘शैतान का चेला’ म्हंटले आहे. ओवेसी म्हणाले कि हा हल्ला पाकिस्तान सरकार, पाकिस्तानी आर्मी आणि ISI च्या इशाऱ्यावर केला गेला होता. या हल्ल्या मध्ये सीआरपीएफ चे 40 जवान शहीद झाले होते.

ओवेसी म्हणाले – आम्ही जिन्नाला ठोकर मारली होती, तुम्ही काय आहात…

पाकिस्तान ला चेतावणी देत ओवेसी म्हणाले – ‘आमच्या देशामध्ये अनेक मुद्द्यांवर राजकीय दला मध्ये एकटा नाही आहे आणि सगळ्यांचे विचार वेगवेगळे आहेत, पण जेव्हा प्रश्न देशाचा येतो तेव्हा आम्ही सगळे एक आहोत.’ ते पुढे म्हणाले ‘पाकिस्तानला भारतात राहणाऱ्या मुसलमानांची चिंता करण्याची गरज नाही. 1947 मध्ये आम्ही जिन्ना ला ठोकर मारत पाकिस्तानच्या ऐवजी भारतास निवडले होते.’

ओवेसी म्हणतात, ‘पाकिस्तानच्या एका मंत्र्याने भारताला धमकावत सांगितले होते कि ते उत्तर देतील तर भारता मध्ये मंदिरात घंटी वाजणे बंद होईल. तर मला सांगायचे आहे जेव्हा पर्यंत या देशात मुसलमान जिवंत आहेत मस्जिदी मधून अजान आणि मंदिरातून घंट्यांचा आवाज बंद होणार नाही. हि आमच्या देशाची सुंदरता आहे, ज्यावर शेजारी देशाचा जळफळाट होतो. या देशात सगळे लोक मिळून मिसळून राहतात आणि जेव्हा प्रश्न देशाचा येतो तेव्हा सगळे एक होतात.’

ओवेसी म्हणाले ‘पुलवामा मध्ये झालेला आतंकवादी हल्ला पाकिस्तानी सरकार, आर्मी आणि ISI चा प्लान होता. आम्हाला पाकिसतानी पंतप्रधानांना सांगायचे आहे कि त्यांनी टीव्ही कैमरे समोर बसून भारताला संदेश देऊ नयेत. तुम्ही हे सुरु केले आहे आणि हा पहिला हल्ला नाही आहे. पठाणकोट आणि उरी नंतर आता पुलवामा मध्ये हल्ला आहे. मला पाकिस्तानी पंतप्रधानांना सांगायचे आहे कि त्यांनी निरागस पणाचे ढोंग बंद करावे.’


Tags
Show More

Related Articles

Back to top button