foodhealthPeople

30 वयानंतर पुरूषांमध्‍ये होतात हे बदल, करू नका दुर्लक्ष

वाढत्‍या वयासोबत पुरूषांमध्‍येही अनेक बदल होण्‍यास सुरूवात होतात. सामान्यत: 30 किंवा 40 वयानंतर पुरूषांमध्‍ये हे बदल दिसायला सुरूवात होतात. यापुर्वी पुरूषांची जी जीवनशैली असते त्‍यानूसार त्‍यांना ब्‍लड प्रेशर किंवा कॉलेज वाढण्‍याच्‍या समस्‍यांना सामोरे जावे लागते. त्‍यामुळेच सुरूवातीपासून आपली लाईफस्‍टाईल हेल्‍दी ठेवणे फार आवश्‍यक आहे. जेणेकरून तुम्‍हाला अशा समस्‍यांना सामोरे जावे लागणार नाही.

ज्‍या पुरूषांना डायबेटीस, ब्‍लड प्रेशर, हार्ट डिसीज असे जेनेटीक आजार आहे. त्‍यांनी तर अधिक सावधानता बाळगण्‍याची आवश्‍यकता आहे. कारण सामान्‍य व्‍यक्‍तीपेक्षा त्‍यांना या आजारांचा धोका अधिक असतो. यामुळे सर्व पुरूषांनी आपल्‍या डेली रूटीनमध्‍ये नियमित व्‍यायाम, डाएट याकडे लक्ष देण्‍याची गरज आहे.

पाचनक्रिया खराब होणे

30 वयानंतर पुरूषांच्‍या पाचनतंत्रामध्‍ये बिघाड होण्‍यास सुरूवात होते. त्‍यामुळे अन्‍न पचवण्‍यास त्‍यांना त्रास होतो. यासोबत त्‍यांचे शरीर कॅलरीही कमी बर्न करते. यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. यामुळे त्‍यांनी रोज व्‍यायाम केला पाहिजे आणि फास्‍ट फूडपासून दुर राहिले पाहिजे.

हाडे कमकुवत होणे

वाढत्‍या वयासोबत हाडेही कमकुवत होऊ लागतात. यामुळे या वयात कॅल्‍शिअम आणि व्हिटॅमिन डीचे भरपूर सेवन केले पाहिजे व नियमित चेकअप केले पाहिजे.

प्रोस्‍टेट (मुत्रग्रंथी) वाढणे

30 वयानंतर पुरूषांमध्‍ये प्रोजेक्ट वाढू लागतात. यामुळे युरिन करताना वेदना होणे, रात्री जास्‍त लघवी होणे अशा समस्‍या भेडसावू लागतात. असे लक्षण दिसल्‍यास त्‍वरीत डॉक्‍टरांना दाखवावे.

कोलेस्‍ट्रॉल जमा होणे

लठ्ठपणामुळे शरीरात कोलेस्‍ट्रॉल जमा होऊ लागते. यामुळे ह्रदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. यासोबतच हाय बीपीचीही समस्‍या होते. यासाठी नियमित व्‍यायामासोबतच तळलेले पदार्थही खावेत.

टेस्‍टोस्‍टेरोन कमी बनणे

30 वयानंतर पुरूषांमध्‍ये टेस्‍टोस्‍टेरोन कमी होऊ लागते. हे सेक्‍स हार्मोन आहे. यामुळे पुरूषांमध्‍ये तणावाची स्थिती निर्माण होते. यावेळी डॉक्टरांचा सल्‍ला घ्‍यावा.


Show More

Related Articles

Back to top button