money

स्वस्त AC विकणार सरकार, ऑनलाइन बुकिंगच्या 24 तासाच्या आत होईल होम डिलिव्हरी

उन्हाळ्यात गरम वातावरणामध्ये AC ची थंड हवा मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण याची महागडी किंमत असल्यामुळे खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. पण आता सरकार लवकरच स्वस्त एसी बाजारामध्ये उपलब्ध करून देणार आहे. सरकार मार्केट रेट पेक्षा 15 % पर्यंत स्वस्त आणि ब्रॅण्डेड AC खरेदी करण्याची संधी देईल. हा AC सरकारी कंपनी EESL लॉन्च करेल. या AC ची किंमत बजेट रेंज मध्ये तर असेलच शिवाय कमी वीज खर्च करेल.

यांच्या संबंधित काही खास गोष्टी

घर बसल्या खरेदी करण्याची संधी

यास घर बसल्या एका क्लिकवर खरेदी करू शकता आणि वाटल्यास एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा करू शकता. आपल्या जुन्या AC च्या बदल्यात बदली करू शकता. यामुळे आपल्या विजेच्या बीला मध्ये 35-40 टक्के कमी येऊ शकते.

सरकार ही सुविधा पुढील दिड महिन्यात देणार आहे. ऑनलाईन बुकिंगच्या 24 तासाच्या आत एसी आपल्या घरा मध्ये लागण्याची गारंटी आहे. यासाठी सरकारी कंपनी EESL जुलै महिन्यात सामान्य ग्राहकांसाठी मार्केट प्लेस लॉन्च करेल.

ग्राहकांना जुलै पर्यंत स्वस्त एसी मिळण्यास सुरुवात होईल. तर कंपनी ने पुढील वर्षा पर्यंत दोन लाख लोकांना AC विकण्याचे टार्गेट ठेवले आहे. लक्षात असू द्या हा एसी तेच ग्राहक खरेदी करू शकतात ज्यांच्या नावावर विजेचे कनेक्शन असेल.

या अगोदर देखील कमी किमती मध्ये उपलब्ध करून दिले आहेत उपकरण

तुमच्या माहितीसाठी EESL तीच कंपनी आहे जिने देशातील अनेक घरा मध्ये स्वस्त LED बल्ब आणि ट्यूबलाइट उपलब्ध करून दिले आहेत. आता कंपनीचे लक्ष घरामध्ये स्वस्त AC देण्याचे आहे. या कंपनीने स्वस्त ट्यूबलाइट आणि पंखे विकण्याचे काम वीज देणारी कंपनी Discom सोबत मिळून केले होते.

वरील माहिती महत्वपूर्ण आणि उपयोगी वाटल्यास आपल्या मित्र आणि कुटुंबियांच्या सोबत शेयर करण्यास विसरू नका. आम्ही आपल्या फायद्याच्या आणि उपयोगाच्या माहिती आणि लेख नेहमी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या या प्रयत्नाला तुमची साथ हवी आहे त्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा. ज्यामुळे आम्ही प्रसिद्ध केलेले नवीन महत्वाचे लेख आणि पोस्ट्स तुमच्या पर्यंत पोहचतील. आपल्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता. सगळ्यात शेवटी वरील माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही. आपण कोणतेही पाऊल उचलण्या अगोदर सत्यता पडताळून पाहावे.


Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button