celebrities

वायुसेना प्रमुखांचा खुलासा, सांगितले- या कारणामुळे पाक च्या एडव्हान्स F-16 समोर भारताला मिग-21 ने उत्तर द्यावे लागले

पाकिस्तानच्या ताब्यातल्या काश्मीर मध्ये 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या एयर स्ट्राइक नंतर पहिल्यांदा वायुसेनाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी मीडिया सोबत संवाद साधला. हल्लीच त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स केली जेथे त्यांनी मीडियाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी आतंकवाद्यांची संख्या, अभिनंदन वर्थमानच्या पुन्हा विमान उडवण्या बद्दल आणि पाकिस्तानच्या एडवांस F-16 ला उत्तर देण्यासाठी मिग-21 चा वापर या सारख्या मुद्द्यांवर संवाद साधला. त्यांनी एक-एक करून सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी सांगितले कि अजून ऑपरेशन समाप्त झालेले नाही. तुमच्या माहितीसाठी, भारता द्वारे केलेल्या एयर स्ट्राइकला पाकिस्तानने दुजोरा दिलेला नाही. एवढेच नाही तर बालाकोट च्या स्थानिक रहिवास्यांनी देखी सांगितले आहे कि त्यांच्या येथे एयर स्ट्राइक सारखे काही झाले नाही आहे. पाकिस्तानी सरकारचे तर म्हणणे आहे कि भारताने एयर स्ट्राइक केला पण त्यांनी जंगलामध्ये बॉम्ब पाडले, ज्यामुळे काही झाडांचे नुकसान झाले आहे. यावर भारतीय वायुसेना प्रमुख म्हणाले कि जर बॉम्ब जंगलात पडले असते तर पाकिस्तान ने जवाबी कारवाई का केली असती.

सांगितले कि मेलेल्या आतंकवाद्यांच्या संख्येची माहिती सरकार देईल

जेव्हा वायुसेना प्रमुखांना मेलेल्या आतंकवाद्यांच्या संख्ये बद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “आम्ही एयर स्ट्राइक मध्ये टारगेट हिट केले. बालाकोट मध्ये मारले गेलेल्या आतंकवाद्यांच्या संख्येची माहिती सरकार देईल.” ते पुढे म्हणाले कि, “लक्ष्या बद्दल विदेश सचिवांनी सविस्तर माहिती दिली आहे. जर आम्ही एखाद्या लक्ष्यावर निशाणा साधण्याची योजना बनवतो, तर आम्ही त्यास निशाणा बनवतो, अन्यथा का त्यांनी (इम्रान खान) उत्तर दिले. जर आम्ही जंगलामध्ये बॉम्ब टाकले होते का त्यांनी उत्तर दिले असते?” त्यांना जेव्हा विचारले गेले कि किती आतंकवादी मारले गेले तेव्हा यावर त्यांनी सांगितले कि, “मृतदेह मोजणे आमचे काम नाही आहे. आम्हाला जे सांगितले गेले होते ते आम्ही केले. किती आतंकवादी या ऑपरेशन मध्ये गेले याचे उत्तर भारत सरकार देईल.” याच दरम्यान एका पत्रकाराने प्रश्न केला कि, “27 फेब्रुवारी रोजी जेव्हा पाकिस्तानी लढाऊ विमान भारतीय सीमेत घुसले होते तेव्हा त्यांच्या एडव्हान्स F-16 विमानांच्या समोर भारताने आपले 60 वर्ष जुने मिग-21 विमान का वापरली?”

एडव्हान्स F-16 समोर या कारणामुळे जुने मिग-21 वापरून उत्तर दिले

या बद्दल एयरचीफ मार्शल उत्तर देतांना म्हणाले, “मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो कि ऑपरेशन दोन प्रकारची असतात. एक जेव्हा तुम्ही योजना बनवून कोणत्याही ऑपरेशनला पूर्ण करता, ज्यामध्ये अगोदर प्लान बनवला जातो आणि नंतर हल्ला केला जातो. जसे आम्ही एयर स्ट्राइक दरम्यान केले होते. काय तुम्हाला त्यामध्ये मिग-21 बाईसन दिसले होते का. आम्ही त्यामध्ये सगळे बेस्ट एयरक्राफ्ट वापरली होती. पण जेव्हा शत्रू तुमच्यावर अटैक करतो तेव्हा तुम्ही त्यावेळी उपलब्ध एयरक्राफ्ट ने उत्तर देता. तुम्ही हा विचार करत बसत नाही कि हे नवीन आहे का जुने. आमच्या जवळ असलेले प्रत्येक एयरक्राफ्ट शत्रूचा सामना करण्यास सक्षम आहे” या दरम्यान त्यांनी सांगितले कि ‘मिग-21’ अपग्रेड केले गेले आहे.


Show More

Related Articles

Back to top button