Breaking News

आज पासून अधिक महिना सुरु होत आहे, या कामाने मिळणार शुभफल, भगवान विष्णु मनोकामना पूर्ण करणार

हिंदू पंचागानुसार, या वेळी अधिक मास 18 सप्टेंबर 2020 पासून सुरू होत आहे आणि 16 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. शारदीय नवरात्र 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल. अधिक महिन्याला पुरुषोत्तम महिना देखील म्हणतात. एका आख्यायिकेनुसार कोणालाही या महिन्याचे स्वामी व्हायचे नव्हते. मग या महिन्या (मास) ने भगवान श्री विष्णू यांच्याकडे प्रार्थना केली. या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांचे उत्तम नाव पुरुषोत्तम दिले. हा महिना दान पुण्य अक्षय फल देणारा मानला जातो. या महिन्यात, अलौकिक कामे अनुकूल नाहीत, परंतु अशी काही कामे आहेत जी झाल्यास शुभ परिणाम मिळतात.

सत्यनारायण देवाची पूजा

अधिक मास भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. भगवान विष्णूच्या पूजेसाठी हा काळ सर्वोत्कृष्ट मानला जातो. जरी अधिक महिन्यात मध्ये सर्व प्रकारचे शुभ कार्य करणे योग्य मानले जात नाही, परंतु आपण या महिन्यात सत्यनारायण पूजा करू शकता, याची तुम्हाला शुभ फल मिळेल. जर आपण अधिक महिन्यांमध्ये भगवान विष्णूची पूजा केली तर देवी लक्ष्मी जीसुद्धा यामुळे प्रसन्न होतील आणि तुमच्या कुटुंबात पैशाशी संबंधित कोणतीही समस्या कधीच येणार नाही.

यज्ञ आणि विधी यामुळे इच्छा पूर्ण होतील

जर आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर अधिक महिना सर्वोत्तम मानला जातो. याकाळात आपण यज्ञ आणि अनुष्ठान करू शकता. असे मानले जाते की यज्ञ आणि कर्मकांड जर अधिक महिन्यात केले गेले तर त्याचे पूर्ण फळ प्राप्ती होते. एवढेच नाही तर देव आपल्या सर्व भक्तांना आनंदी ठेवून सर्व इच्छा पूर्ण करतो.

अधिकमामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करावा

अधिमासात तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास सर्व ग्रह दोषांची शांती होते. महामृत्युंजय मंत्र जप सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. आपली इच्छा असल्यास, आपण पुरोहित कडून संकल्प करून महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. हे घरातील सर्व प्रकारचे दोष दूर करेल आणि आपल्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण करेल.

दानधर्म करणे

जर एखादी व्यक्ती अधिक महिन्यांत दानधर्म करत असेल तर त्याचा शुभ परिणाम होतो. अधिक महिन्यात तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तु दान करू शकता, यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळेल. एवढेच नाही तर गुरु ग्रहही बळकट होईल. जर तुमच्या कुंडलीत गुरु ग्रह बळकट असेल तर तो तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत सतत यश देईल.

अधिक महिन्यात हे काम करणे टाळले पाहिजे

  • लग्नासारखे शुभ काम या महिन्यात करू नये कारण यामुळे कोणत्याही प्रकारचा आनंद मिळत नाही. या काळात लग्नासारख्या गोष्टी केल्या गेल्या तर नवरा-बायकोच्या नात्यात मतभेद कायम राहतात.
  • अधिक महिन्यांत कोणताही नवीन व्यवसाय किंवा नवीन काम सुरू करू नये.
  • मुंडन, कर्णवेध किंवा इतर कोणतेही संस्कार कार्य अधिक महिन्यात करू नये.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About Marathi Gold Team