Connect with us

ही अभिनेत्री 4 अफेयर आणि एका लग्ना नंतर 5 व्या व्यक्ती सोबत नात्याच्या चर्चेत, करोडोची संपत्ती आहे हिच्या नावे

Celebrities

ही अभिनेत्री 4 अफेयर आणि एका लग्ना नंतर 5 व्या व्यक्ती सोबत नात्याच्या चर्चेत, करोडोची संपत्ती आहे हिच्या नावे

बॉलीवूडच्या दुनिये मध्ये दररोज नवनवीन चर्चा होत असतात या इंडस्ट्री मध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे आपल्या फिल्म्समुळे नेहमी चर्चे मध्ये असतात तर त्याहून जास्त असे स्टार्स आहेत जे फिल्म्स पेक्षा जास्त इतर कारणासाठी चर्चेत असतात. या स्टार्स मध्ये काही अभिनेत्री अश्या आहेत ज्या आपल्या आयुष्यातील घात्नांच्यामुळे मिडीया मध्ये चर्चेचा विषय असतात याच अभिनेत्रीं पैकी एक अभिनेत्री बद्दल आज माहिती घेणार आहोत जिचे चार अफेयर आणि एक लग्न झालेले असून सुध्दा जिचे नाते आता पाचव्या व्यक्ती सोबत जोडले जात आहे.

खरतर ही अभिनेत्री आपण अनेक चित्रपटा मध्ये पाहिली आहे पण या अभिनेत्रीला खरी ओळख मोहब्बते चित्रपटा मधूनच मिळाली. या अभिनेत्रीचे नाव आहे किम शर्मा. हल्ली अभिनेत्री किम शर्मा आपल्या अफेयर मुळे चर्चेत आहे अभिनेत्री किम शर्मा बहुतेक वेळा हर्षवर्धन राणे सोबत स्पॉट झालेली आहे पण आपल्या नात्या बद्दल कधीही यांनी मिडीया समोर जाहीर केले नाही यांनी आपल्या नात्या बद्दल मिडीया समोर नेहमी नकार दिला आहे. पण याच दरम्यान अभिनेत्री किम शर्माने सोशल मिडीयावर एक अशी पोस्ट शेयर केली आहे ज्यामुळे त्यांच्या नात्या बद्दल चर्चा वाढली आहे. या पोस्ट मध्ये अभिनेत्री किम शर्मा ने हर्षवर्धन राणे सोबत एक फोटो पोस्ट केली आहे. किम शर्मा या अगोदर हर्षवर्धन राणे सोबत मुंबईच्या रस्त्यावर स्कूटीवर फिरतांना दिसली होती.

अभिनेत्री किम शर्मा सोबतच्या या फोटो मध्ये हर्षवर्धन राणे स्कूटी चालवतांना दिसत आहेत आणि अभिनेत्री किम शर्मा त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून बसलेली दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी हर्षवर्धन राणे बॉलीवूड फिल्म ‘सनम तेरी कसम’ मध्ये होते. यानंतर पलटण चित्रपटा मध्ये देखील ते होते. परंतु जर आपण अभिनेत्री किम शर्मा बद्दल बोलायचे झाले तर किम शर्मा यांना जास्त यश मिळाले नाही पण आपल्या अफेयरमुळे किम शर्मा नेहमी चर्चेत राहिली आहे.

अभिनेत्री किम शर्मा बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्री मधील एक मानली जाते किम शर्माने बॉलीवूड करियरची सुरुवात वर्ष 2000 मध्ये रिलीज झालेल्या मोहब्बते चित्रपटा मधून केली होती. या चित्रपटामध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय सोबत काम करण्याची संधी तिला मोहबत्ते मध्ये मिळाली. प्रेक्षकांना चित्रपट आवडला होता आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटामुळे किम शर्मा बॉलीवूड मधील प्रसिध्द आणि आघाडीची अभिनेत्रीच्या लिस्टमध्ये शामिल झाली होती.

बॉलीवूड फिल्म मोहबत्ते मध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री किम शर्मा ने बॉलीवूड मधील अनेक चित्रपटा मध्ये काम केले परंतु पहिल्या चित्रपटा एवढे यशतील पुन्हा मिळाले नाही. पण आपल्या चित्रपटाची चर्चा होण्या पेक्षा किम आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडीमुळे चर्चेत राहील. अभिनेत्री किम शर्मा क्रिकेटर युवराज सिंह सोबतच्या अफेयरमुळे सर्वाधिक चर्चेत होती. या दोघांचे नाते जवळपास चार वर्ष होते आणि यानंतर यांचे ब्रेकअप झाले.

अभिनेत्री किम शर्माने वर्ष 2010 मध्ये केन्या मध्ये राहणाऱ्या बिजनेसमैन अली पुंजानी सोबत मोम्बासा मध्ये लग्न केले पण या दोघांचा वर्ष 2017 मध्ये डिवोर्ससाठी अर्ज केला. अली पुंजानी पहिल्या पासूनच विवाहित होते आणि त्यांना 3 मुले होते. त्यांनी आपल्या पत्नी सोबत डिवोर्स घेऊन अभिनेत्री किम शर्मा सोबत विवाह केला होता.

अभिनेत्री किम शर्मा जेव्हा अली पुंजानी पासून वेगळी झाली त्यानंतर ती मुंबईच्या फैशन डिजाइनर अर्जुन खन्नास डेट करत होती. बातम्यांच्या अनुसार असे मानले जाते कि अर्जुन खन्ना सोबत देखील तिचा ब्रेकअप झाला आहे. खरतर अर्जुन खन्ना पहिल्या पासूनच विवाहित आहे आणि अर्जुन खन्नाच्या पहिल्या पत्नीचे नाव शेफाली आहे.

Trending

Advertisement
To Top