24 भाऊ-बहिणी मध्ये वाढलेला हा एक्टर 60 फिल्म मध्ये बनला नारद मुनि, खलनायक बनून झाला प्रसिद्ध

अनेक फिल्म मध्ये व्हिलन बनून फेमस झालेले एक्टर जीवन यांची आज 104 वी बर्थ एनिवर्सरी आहे. 70 आणि 80 च्या दशकाच्या फिल्म मध्ये जीवन व्हिलनच्या मुख्य भूमिकेत दिसून येत असत. जीवन यांचे निधन 1987 मध्ये वयाच्या 71 व्या वर्षी झाले होते. जीवन यांचे नाव घेताच त्यांची व्हिलन म्हणून तयार झालेली इमेज समोर येते. पण आज त्यांच्या बर्थ एनिवर्सरी निमित्त आपण त्यांच्या जीवनातील काही रहस्य जाणून घेऊ. ज्यानंतर ते व्हिलन नाही तर हिरो वाटतील.

जीवन यांचा जन्म 1915 साली कश्मीर मध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव ओंकार नाथ धार होते. ते लहानपणा पासूनच एक्टर बनू इच्छित होते. जीवन यांचे कुटुंब मोठे होते. त्यांचे 24 भाऊ-बहीण होते. जीवन यांच्या जन्मा नंतर त्यांच्या आईचे निधन झाले होते. जेव्हा जीवन 3 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील देखील जगाचा निरोप घेऊन निघून गेले. जीवन अश्या कुटुंबातील होते जेथे त्यांना एक्टर होण्याची परवानगी नाही मिळाली होती. त्यामुळे ते 18 वर्षाचे असतानाच घरातून पळून मुंबईला आले होते. जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा त्यांच्या जवळ केवळ 26 रुपये होते.

करियरच्या सुरुवातीच्या काळात जीवन यांना भरपूर स्ट्रगल करावा लागला. त्यांना एक नोकरीची गरज होती त्यामुळे ते एका स्टुडिओ मध्ये काम करायला लागले. तो स्टुडिओ मोहनलाल सिन्हा यांचा होता. मोहन लाल त्यावेळी प्रसिद्ध डायरेक्टर होते. जेव्हा मोहनलाल यांना समजले कि जीवन एक्टिंग करू इच्छितात तेव्हा त्यांनी आपली फिल्म ‘फैशनबल इंडिया’ मध्ये रोल दिला. त्यानंतर जीवन यांना एकानंतर एक अनेक फिल्म मध्ये काम मिळाले. जीवन यांनी वेगवेगळ्या भाषेतील जवळपास 60 फिल्म मध्ये नारद मुनिची भूमिका केली आहे.

50 च्या दशकात बनलेल्या प्रत्येक धार्मिक फिल्म मध्ये त्यांना नारद मुनि चा रोल मिळत होता. जीवन यांना त्यांची ओळख तेव्हा मिळाली जेव्हा 1935 मध्ये त्यांना फिल्म ‘रोमॅंटिक इंडिया’ मध्ये काम मिळाले. त्यानंतर जीवन यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. जीवन यांचे ‘अफसाना’, ‘स्टेशन मास्टर’, ‘अमर अकबर एंथनी’ आणि ‘धर्म-वीर’ हे काही अविस्मरणीय फिल्म आहेत. त्यांनी नागिन, शबनम, हीर-रांझा, जॉनी मेरा नाम, कानून, सुरक्षा, लावारिस इत्यादी फिल्म मध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे.

जीवन यांना आपल्या सुरुवातीच्या काळातच समजले होते कि आपला चेहरा हिरोच्या लायक नाही आहे. त्यामुळे त्यांनी खलनायक म्हणून भूमिका केल्या आणि यश मिळवले. जीवन यांची डायलॉग डिलीवरी अप्रतिम होती. त्यांना जीवन हे नाव विजय भट्ट यांनी दिले. जीवन यांनी पंजाबी फिल्म मध्ये देखील काम केले होते. जीवन यांनी फोटोग्राफी, नृत्य, एक्शन, संगीत इत्यादी मध्ये देखील नशीब आजमावले पण अपयशी राहिले. आपल्या माहितीसाठी जीवन यांचे पुत्र किरण कुमार हे देखील प्रसिद्ध एक्टर आहेत.