inspiration

आचार्य चाणक्य अनुसार या गोष्टी व्यक्तीसाठी आहेत शाप, जिवंतपणातच देतात मरण यातना

आचार्य चाणक्य यांनी आपले जीवन सुखी होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांना आपण चाणक्यनिती म्हणतो परंतु या गोष्टी एवढ्या सखोल आहेत की कधीकधी यांच्या बद्दल समजणे थोडे कठीण होते आणि याचा आपल्या जीवना सोबत काय आणि कसा संबध आहे हे समजणे अवघड होते. आज आम्ही काही गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्या व्यक्तीला आतल्याआत जाळत असतात आणि त्याचा त्रास सतत आपल्याला होत असतो.

व्यक्तीला आतल्याआत जाळणाऱ्या गोष्टी

पत्नी आणि प्रेमिके पासून दुरावा किंवा वियोग

आचार्य चाणक्य म्हणतात की कोणताही व्यक्ती आपल्या पत्नी किंवा प्रेमिके पासून दुरावा सहन करू शकत नाही आणि तो या दुराव्याचा सामना करू शकत नाही.

नातेवाईक किंवा मित्रांच्या कडून अपमान

जर एखाद्या व्यक्तीला आपल्या नातेवाईक किंवा मित्रांकडून अपमानित व्हावे लागले तर या पेक्षा दुःखदायक गोष्ट त्याच्यासाठी दुसरी कोणतीच नसते. आचार्य म्हणतात आपल्या लोकांकडून अपमानित झालेली ती वेळ कोणीही कधीही विसरू शकत नाही.

व्यक्तीने घेतलेले कर्ज

ज्या व्यक्तीने कर्ज घेतलेले असते आणि परत फेड करणे शक्य नसते अश्या वेळी तो व्यक्ती सतत आपल्या कर्जाचा विचार करत असतो आणि यागोष्टीचा त्याला प्रचंड त्रास होत असतो.

कपटी मालक किंवा राजाची सेवा

ज्या राज्याचा राजा कपटी आणि चरित्रहीन अआहे त्या राज्यातील जनतेला नेहमी दुखः भोगावे लागतात तसेच जर मालक कपटी असेल तर त्याचा सेवक नेहमी दुखी असतो.

निर्धनता

माणसाच्या जीवनात सर्वात मोठे दुखः कोणते असेल तर ते त्यांची निर्धनता. निर्धनता हा एक मोठा शाप मानला जातो. आर्थिक तंगी मुळे व्यक्तीला नेहमी दुखी राहावे लागते.

वर सांगितलेल्या आचार्य चाणक्यांच्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले आणि अश्या गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागू नये अशी काळजी घेतली तर आणि अशी वेळ आलीच तर त्यासाठी मनाची पूर्व तयारी करून ठेवली तर तुम्हाला त्रास कमी होईल.

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या वरील 5 गोष्टी पैकी कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त वेदनादायक असू शकते असे वाटते? आचार्य चाणक्य यांचे हे विचार तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा.


Show More

Related Articles

Back to top button