Breaking News

स्वताचे घर पाहिजे तर ज्योतिष मधील हे 2 उपाय करा, लवकरच होऊ शकते आपली इच्छा पूर्ण

ज्योतिष अनुसार कुंडलीच्या चवथ्या भावाचा स्वामी चर राशी (मेष, कर्क, तुला किंवा मकर) मध्ये असेल आणि चवथ्या भावाचा स्वामी शुभ ग्रहा सोबत असेल तर असा व्यक्ती अनेक वास्तू मध्ये राहतो आणि त्यास अनेक घर बदलावे लागतात. जर चर राशीच्या ऐवजी स्थिर राशी (वृषभ, सिंह, वृश्चिक किंवा कुंभ) असतील तर त्या व्यक्ती जवळ स्थायी घर असते.

कुंडलीच्या चवथ्या भावाचा स्वामी (चतुर्थेश) शुभ असेल आणि लग्न भावाचा स्वामी, चवथ्या भावाचा स्वामी, दुसऱ्या भावाचा स्वामी या तीन पैकी जितके ग्रह केंद्र-त्रिकोण (1,4,5,7, 10 व्या भावात) असतील, तर व्यक्तीला तेवढे घर होतात.

कुंडली मध्ये नवम भावाचा स्वामी दुसऱ्या भावा मध्ये आणि दुसऱ्या भावाचा स्वामी नवम भावा मध्ये असेल तर अशी व्यक्ती चा भाग्योदय बारा वर्षात होतो. अश्या व्यक्तीला 32 व्या वर्षा नंतर वाहन, भवन आणि नोकर यांचे सुख मिळते.

चला ज्योतिष अनुसार स्वतःचे घर मिळवण्यासाठी कोणकोणते उपाय आपण करू शकतो. ज्यामुळे स्वतःच्या मालकीचे घर मिळवण्यात यश मिळू शकते.

पहिला उपाय: स्वतःचे घर मिळवण्यासाठी भगवान विष्णूच्या कूर्म स्वरूपाची पूजा केली पाहिजे. विष्णू देवाच्या प्रतिमे समोर कूर्मदेवाची प्रतिमा किंवा चित्र स्थापित केले पाहिजे. या कासवाच्या खाली नऊ वेळा नऊ अंक लिहावा.

भगवंतास पिवळे फळ, पिवळे वस्त्र अर्पण करावे. तुळशी कूर्मदेवावर ठेवावे. फुल अर्पित करावे. भगवंताची आरती करावी. आरती नंतर प्रसाद इतर भक्तांना द्यावा. पूजेच्या नंतर कूर्मदेवला एखाद्या कपाटा मध्ये लपवून ठेवले पाहिजे. या प्रयोगाने भूमी-संपत्ती प्राप्ती चे योग बनू शकतात.

दुसरा उपाय: रात्री झोपताना आपल्या डोक्या जवळ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्या पाण्यात एक चुटकी कुंकू, एक लहान गुळाचा खडा टाकावा. सकाळी उठल्यावर पिंपळाच्या झाडाला हे अर्पण करावे. हा उपाय नियमित केल्याने घराच्या संबंधित येणाऱ्या अडचणी दूर होतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.