horoscope

शुक्रवार 26 एप्रिल :

गुरुवार 26 एप्रिल : आज ह्या ४ राशींना करावा लागू शकतो विघ्नांचा सामना, वाईट मित्रांन पासून रहा सावधन

आज शुक्रवार 26 एप्रिल चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल.

वृषभ राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

थोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

मिथुन राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल – आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

कर्क राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णूतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरुपी फूट पडू शकते. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल, सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल.

सिंह राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. प्रियाराधनाचे विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कन्या राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल – म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांकडून एखादी जबरदस्त बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल.

तुल राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर करीअरमधील प्रगतीसाठी गरजेचे आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

खेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आपल्या मुलांच्या अभ्यासाबाबत काळजी करू नका. सध्या जरी तुम्ही काही प्रश्नांना सामोरे जात असाल तरी ते क्षणिक असतील, काळाप्रमाणे ते प्रश्न संपून जातील. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

धनु राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणूकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल.

मकर राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

तुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतीधैर्य उंचावेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात – आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.

कुम्भ राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. एका मिठीचे आरोग्यावर होमाणे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील. तुमच्या जोडीदार आज तुम्हाला या परिणामांची अनुभूती अनेकदा देणार आहे.

मीन राशी भविष्य (Friday, April 26, 2019)

प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊद्या, त्यागाची आत्मसर्मपणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही.


Show More

Related Articles

Back to top button