horoscope

गुरुवार 18 एप्रिल : या 4 राशींवर माता लक्ष्मी करणार कृपा, तर 2 राशींना समस्या येऊ शकतात

आज गुरुवार 18 एप्रिल चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभवती असलेल्या लोकांना प्रभावित करील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठी नाकारलीतर तर तो/ती दुखावेल.

वृषभ राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

संताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रत्येकाच्याच गरजा पुºया करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुम्ही ओढाताण होईल. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात, याचं हे लक्षण आहे! महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमँटिक असणार आहे.

मिथुन राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा वेळ काढी आणि मित्रमंडळींसमवेत आज बाहेर जा. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत:च घ्या, त्यांचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात.

कर्क राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि घर तसेच मित्रमंडळींमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करा. प्रणयराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

सिंह राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुमचा/तुमची जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्ही त्याला/तिला थोडीशी मदत करण्याची गरज आहे.

कन्या राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. पत्नीशी सुसंवाद साधून स्वरमिलाफ साधणारा दिवस. नातेसंबधात कुटुंबातील दोन्ही व्यक्तीनी, गुंतवणूक ही प्रेम आणि विश्वासाशी बांधिलकी ठेवणारी असावी. जबाबदारी स्वीकारून योग्य प्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

तुल राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

तुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटूंबातील सदस्यांना मदत करा. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

धनु राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यापान टाळा. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल. एकमेकांचे आयुष्य कमी अडचणींचे करू शकला नाहीत तर मग जगण्याला अर्थ काय राहतो. आपल्या प्रियसी/प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करु नका. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल.

मकर राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घ्या. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. नोकरी बदलणे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. सध्याची नोकरी सोडून तुम्हाला सूट होणा-या मार्केटींग यांसारख्या क्षेत्रात काम करावे. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतित करणार आहात.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. आज तुम्ही सहजपणे समस्यांवर मात कराल आणि विजेते ठराल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो/ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल.

मीन राशी भविष्य (Thursday, April 18, 2019)

तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. आज तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेले असेल ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल.


Show More

Related Articles

Back to top button