horoscope

मंगळवार 14 में : आज या 4 राशी राहतील शक्तिशाली, देवाचा मिळेल आशीर्वाद, नोकरी मध्ये मिळेल यश

आज मंगळवार 14 में चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहीती तुम्ही उघड करु नका. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे. त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

मानसिक ताणतणावर मात करण्यासाठी अध्यात्मिक, धार्मिक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योगसाधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. मित्र आणि नातेवाईक मदत करतील, त्यांच्या सहवासात तुम्ही बरेच आनंदी रहाल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.

कर्क राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल – थोडा आराम करा आणि सात्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीच्या संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्बा घालतील.

सिंह राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

कन्या राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

अधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुम्हाला एकाकी वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या कुटूंबियांची मदत घ्या. त्यामुळे नैराश्यापासून तुमचा बचाव होईल. परिणामी सुयोग्य, संयुक्तिक निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल. प्रणय करायला मिळण्याची शक्यता आहे परंतु कामुक भावना उद्दिपित झाल्याने जोडिदाराशी संबंध बिघडतील. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा/तुमची जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल.

तुल राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञांचे पालन करा. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे/भागादाराकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती नाराज होतील. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. नातेवाईकांना भेटून त्यांच्यासमवेत वेळ घालविल्याने तुमचा फायदा होऊ शकेल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत.

धनु राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

उच्च कॅलरी असणारा आहार टाळा, आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी, प्रामाणिकपणा असू द्या. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहका-यांवर तुम्ही वैतागाल. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम प्रदीर्घ काळपर्यंत उमटतील.

मकर राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारिरीक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. तुमच्या घरातील लोकांसोबत काहीतरी वेगळ्या आणि उत्साहवर्धक गोष्टी कराल. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासातरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. रोमान्ससाठी चांगला दिवस. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या त-हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत – तर तुम्ही फायद्यात राहाल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल.

मीन राशी भविष्य (Tuesday, May 14, 2019)

मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. प्रत्येकाच्याच गरजा पुºया करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुम्ही ओढाताण होईल. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाºयांकडून टीका होईल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.


Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button