horoscope

शनिवार 13 एप्रिल : शनिदेवाच्या कृपेने या 4 राशीच्या घरामध्ये येणार शुभवार्ता, मोठे यश मिळणार

आज शनिवार 13 एप्रिल चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल.

वृषभ राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

विनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे.

मिथुन राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमादेखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल.

कर्क राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

सिंह राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

नातेवाईकांबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि आत्यंतिक गरज असणारा रिलिफ मिळेल. तुम्ही सुदैवी असल्यामुळेच असे नातेवाईक तुम्हाला लाभतील. हुशारीने गुंतवणूक करा. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. अचानक प्रणयाराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लीत व्हाल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल.

कन्या राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

तुल राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल, सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.

वृश्चिक राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा शृंगार अधिक खुलतो.

धनु राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅण्टिक आनंद देईल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल.

मकर राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. आज तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभी राहील.

कुम्भ राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील – परंतु केवळ गप्पा करणाºया लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या रोमॅण्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

मीन राशी भविष्य (Saturday, April 13, 2019)

मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close