horoscope

गुरुवार 02 ऑगस्ट : माता लक्ष्मीची कृपा आज या 4 राशींवर राहील, पूर्णत्वास जातील सर्व कामे

आज गुरुवार 02 ऑगस्ट चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकला. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

वृषभ राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

तुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्यावर आपले निर्णय मते लादू नका, कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाहीत, आणि ते विनाकारण नाराज होतील. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा. तुम्ही तुमचे ज्ञान व अनुभव इतरांना सांगितलात तर तुम्ही मान्यता पावाल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा/उभी राहणार नाही.

मिथुन राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

कायदेशीर बाबींमुळे काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करावी. कारण नसताना नुकसान होऊ नये यासाठी योग्य सल्ला घेणे चांगले. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. प्रेमामध्ये जोरजबरदस्ती टाळा. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

कर्क राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. अतिजवळिक साधणाºया अनोळखी व्यक्तींपासून योग्य अंतर राखा. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा प्रेमात पडाल, कारण तो/ती यासाठी खरच लायक आहे.

सिंह राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

अवघडेलपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. तणाव दूर घालविण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. सावधनता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु शकते. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाला, पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं.

कन्या राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

तुमची चिंता, काळजी मिटविण्याची आत्यंतिक गरज असणारा काळ आहे. आपली शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच पण तुमच्या आयुष्यदेखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे लागेल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. मालमत्तेसंबंधी वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे. शक्य झाल्यास सामोपचाराने समस्या सोडवा. यासंदर्भात कज्जेदलालीचा फायदा होण्याची शक्यता नाही. आज तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

तुल राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

दिवसभराच्या कामात आरोग्याच्या समस्या हस्तक्षेप करू शकतात. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाºयांकडून टीका होईल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबिय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

ताणतणाव, दडपण टाळा कारण त्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. राग येणे टाळता येण्यासारखे नसले तरी रागाच्या भरात बोलताना सांभाळून बोला. त्यामुळे तुमच्यावर प्रेम करणाºया आणि तुमची काळजी वाटणाºया लोकांना दुखावण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखू शकाल. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, कामच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. पाऊस नेहमी रोमँटिकच असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमँटिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल.

धनु राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. नातेवाईकांमुळे तुम्ही काहीसे त्रस्त व्हाल. परिस्थिती हाताळण्यासाठी शांतपणे राहून पावले उचला. घाईघाईत, तडकाफडकी निर्णय घेतला तर महागात पडू शकते. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कणखर राहा. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा दिवस. तुमचा/तुमची जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल.

मकर राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्र परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील, पण हीच वेळ आहे, तुम्ही तुमची सर्व दारं जगासाठी बंद करून स्वत:ला राजेशाही वागणूक द्या. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

शारीरिक व मानसिक आजारपणामुळे विषण्णता येईल. अनुमान लावून कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. कौटुंबिक जबाबदा-या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. जुजबी मतभेद झाल्याने प्रणयराधनाचा योग नाही. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. तुम्हाला तुमच्या जोडीदाशी असलेल्या भावनिक नात्याबद्दलच संशय निर्माण होईल, जे चुकीचे आहे.

मीन राशी भविष्य (Thursday, August 02, 2018)

आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. मूडमधील आणि ठरवलेल्या वेळापत्रकातील बदल तुमच्यावर हावी होऊ शकतात. प्रियाराधन करताना डोक्याचा वापर करा कारण प्रेम नेहमी आंधळेच असते. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर रागावलात तर तुम्हाला तडक प्रत्युत्तर मिळेल, म्हणून थोडे शांत राहा.


Show More

Related Articles

Back to top button