बुधवारचा दिवस या 7 राशीसाठी राहणार सर्वोत्तम, गणपतीच्या कृपेने होणार बंपर धनलाभ

जाणून घेऊ आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील. आज आपल्याला कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते.

मेष राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

आपल्या वजनावर लक्ष ठेवा, अतिखाण्यात आनंद मानू नका. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवला नाहीत – तर घरात समस्या उद्भवू शकते. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे – तुमच्या मनावर दबाव येईल. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरु करणे टाळा, गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. तुम्ही भागीदारांच्या/जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो/ती असहनशील बनतील. तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका – अन्यथा नंतर तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल.

कर्क राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.

सिंह राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाºयांना राग येऊ शकतो – कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुम्ही आयुष्यात अाल्याने तुमचा/तुमची जोडीदार स्वत:ला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या.

कन्या राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका, शांततेला मारक ठरू शकते. तुम्ही आयुष्यभर प्रेम केलेत तर तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.

तुल राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. मित्रमंडळींबरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील, पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी जावे लागेल. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करु शकते. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही.

धनु राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्परसंमतीने सोडवता येतात. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. खूप कालावधीनंतर तुम्ही आणि तुमचा/तुमची जोडीदार कोणत्याही भांडणाशिवाय शांत दिवस घालवाल, फक्त प्रेम कराल.

मकर राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे. त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

मीन राशी भविष्य (Wednesday, July 17, 2019)

आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. रोमान्ससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त रोमॅण्टीक करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल – आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here