आज आहे श्रावणी सोमवार, भोलेनाथ या 8 राशींवर प्रसन्न होऊन देणार वरदान

आम्ही तुम्हाला सोमवार 12 ऑगस्ट चे राशीफळ सांगत आहोत. राशीफळाचे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्व आहे. राशीफळ आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांची चाहूल करून देते. राशीफळाचे निर्माण ग्रह गोचर आणि नक्षत्रांची चाल यांच्या आधारावर केली जाते. प्रतिदिन ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर प्रभाव पाडत असते. या राशीफळामध्ये आपली नोकरी, व्यापार, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच आपले स्वास्थ्य याबद्दलची माहिती मिळेल. जर आपल्याला हि आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर वाचा Rashifal 12 August 2019

मेष राशि (Aries) च, चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ :

प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून त्यांना अस्वस्थ करणारे विषय बोलण्याचे टाळा. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.

वृषभ राशि (Taurus) ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो ब बो :

सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. हुशारीने गुंतवणूक करा. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिके/का ला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे. एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं.

मिथुन राशि (Gemini) का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह :

जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. सहका-यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमचा/तुमची जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

कर्क राशि (Cancer) ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो :

प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्याावे लागेल. योग्य तो वैद्याकीय सल्ला घ्या, छोटेसे दुर्लक्षदेखील प्रश्न गंभीर करू शकते. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल, सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

सिंह राशि (Leo)मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे :

आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाहबंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे.

कन्या राशि (Virgo) ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो :

मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल – म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्याकीय मदतीची गरज भासेल. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमँटिक असणार आहे.

तुला राशि (Libra) रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते :

आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि तुमच्या कुटूंबीयांसमवेत काही प्रेमाचे क्षण अनुभवा. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल.

वृश्चिक राशि (Scorpio) तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू :

खेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

धनु राशि (Sagittarius) ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे :

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. आजच्या दिवशी तुमचा/तुमची जोडीदार क्षणार्धात तुमची दु:ख दूर करेल.

मकर राशि (Capricorn) भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी :

तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतीधैर्य उंचावेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे.

कुंभ राशि (Aquarius) गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा :

पैशांची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण तुमच्याकडे सल्ला मागतील. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्बा घालतील.

मीन राशि (Pisces) दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची :

आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊद्या, त्यागाची आत्मसर्मपणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. मतभेदांमुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.

आपण Rashifal १२ ऑगस्ट २०१९ मध्ये सगळ्या राशींचे rashifal वाचले. आपल्याला Rashifal 12 August 2019 चे हे rashifal कसे वाटले? कमेंट करून आपला अभिप्राय आवश्य द्या आणि हे राशीफळ आपल्या मित्रांच्या सोबत शेयर करण्यास अजिबात विसरू नका.

नोट : आपल्या कुंडली आणि राशी ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना आणि Rashifal 12 August 2019 मध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी कोणत्याही तज्ञ ज्योतिषीला भेटू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here