Uncategorized

आधार कार्ड करू शकता ऑनलाईन रीप्रिंट अशी आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस

आधारकार्ड हे एक महत्वाचे आयडेंटिटी डॉक्युमेंट मानले जाते. अश्यात जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर आपल्याला त्यामुळे समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पण जर आपल्याला वाटले तर आपण घर बसल्याच ड्युप्लिकेट आधार कार्ड मिळवण्यासाठी अप्लाय करू शकता. तसे तर त्यास ऑनलाईन वेबसाईट वर जाऊन रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून काढता येते. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा तुमच्या आधार मध्ये मोबाईल नंबर रजिस्टर नसतो अश्या परिस्थिती मध्ये आपण ऑनलाईन आपला आधार काढू शकत नाही त्यामुळे अडचण निर्माण होते. पण आता तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही आहे.

अशी आहे पूर्ण प्रोसेस

आधार कार्ड करू शकता ऑनलाईन रीप्रिंट

आता मोबाईल नंबर रजिस्टर न करताही आपण आपला आधार रिकवर करू शकतो. यासाठी UIDAI लोकांना परवानगी देतो कि ते आपला आधार कार्ड ऑनलाईन रीप्रिंट करू शकतात. असे करण्यासाठी ग्राहकांना आपला करंट मोबाईल नंबर द्यावा लागेल ज्यामध्ये वन टाइम पासवर्ड पाठवले जाईल.

अश्या प्रकारे आपला आधार कार्ड रीप्रिंट करू शकता तुम्ही

सगळ्यात पहिले आधार ची वेबसाईट uidai.gov.in उघडा.

आधार रीप्रिंट ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा.

आपला आधार नंबर आणि इतर डिटेल भरा.

आपला करंट मोबाईल नंबर वेरिफिकेशन करण्यासाठी टाका.

तुम्ही पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बैंकिंग किंवा युपीआई तुमच्या सोई प्रमाणे करू शकता. तुम्हाला आधार रीप्रिंट करण्यासाठी 50 रुपये द्यावे लागतील. पेमेंट डिटेल एंटर करा आणि पे नाउ वर क्लिक करा.

वरील प्रोसेस वापरून तुम्ही आपला आधार कार्ड रीप्रिंट करू शकता तर आपल्या आधार कार्ड मधील चुका म्हणजेच नावामध्ये, जन्मतारीख, लिंग, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर इत्यादी बदल करायचे असतील तर त्यासाठी वेगळी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे हे तुम्हाला खालील लिंकवर वाचण्यास मिळेल.

घरबसल्या आधार कार्ड मधील चुका दुरुस्त करण्यासाठी काय करावे हे तुम्ही येथे वाचू शकता.

तुम्हाला वरील माहिती उपयुक्त आणि महत्वाची वाटली असेल तर पोस्ट लाईक आणि शेयर करण्यास विसरू नका. हि माहिती आपल्या मित्र परिवारासाठी देखील उपयुक्त ठरू शकते त्यामुळे जास्तीत जास्त पोस्ट शेयर करा. आम्ही आपल्यासाठी अश्याच महत्वाच्या आणि उपयोगाच्या पोस्ट शेयर करत असतो त्यामुळे आमच्या पोस्ट नियमित वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवतो त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये लिहण्यास विसरू नका.

Related Articles

Back to top button