केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगाराच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी नव्या Employment Linked Incentive (ELI) योजनेची घोषणा केली आहे. ही योजना EPFO मार्फत राबवली जाणार असून, पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या पात्र तरुणांना सरकारकडून थेट Rs 15,000 प्रोत्साहनरक्कम दिली जाईल.
कोणाला मिळणार या योजनेचा लाभ?
EPFO च्या अतिरिक्त आयुक्त राजीव बिष्ट यांच्या माहितीनुसार, ही योजना अशा युवकांसाठी आहे जे प्रथमच नोकरी करत आहेत आणि EPFO मध्ये नोंदणीकृत आहेत. ज्यांची मासिक सैलरी Rs 1 लाख पर्यंत आहे, अशा युवकांना दोन टप्प्यांमध्ये एकूण Rs 15,000 ची प्रोत्साहनरक्कम मिळेल. ही रक्कम त्यांच्या ईपीएफ पगाराच्या आधारावर दिली जाणार आहे.
नियोक्त्यांनाही मिळणार मदत
हे प्रोत्साहन फक्त नोकरीस लागणाऱ्यांसाठीच नाही तर कंपन्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2027 दरम्यान नवे कर्मचारी भरती करणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक कर्मचार्यामागे Rs 3,000 प्रतीमहिना प्रोत्साहन दिलं जाईल. यामुळे कंपन्यांना भरती करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल.
दुसऱ्या टप्प्यानंतर ‘फायनान्शियल लिटरेसी’ कोर्स
या योजनेचा कालावधी 2 वर्षांचा असून, उत्पादन क्षेत्रातील नियोक्त्यांना 4 वर्षांपर्यंत लाभ घेता येणार आहे. प्रोत्साहनाच्या दुसऱ्या हप्त्यानंतर सरकार लाभार्थींना फायनान्शियल अवेअरनेस कोर्स करून देईल, ज्यात बचतीसाठी मार्गदर्शन केले जाईल.
या योजनेमागचा उद्देश काय आहे?
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युवांसाठीच्या 5 योजनांच्या पॅकेजचा एक भाग आहे. सरकारचा उद्देश 4.1 कोटी युवकांना रोजगार, कौशल्यविकास व अन्य सुविधांद्वारे सक्षम बनवण्याचा आहे. या उपक्रमांमुळे देशात कुशल वर्कफोर्स तयार होईल व बेरोजगारीला आळा बसेल.
Disclaimer: वरील माहिती ही अधिकृत स्रोतांवर आधारित असून यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. योजना लागू करण्यासंबंधी अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित यंत्रणेच्या सूचनांचा आधार घ्यावा.

