Tablet Sale: जर तुम्ही नवीन टॅबलेट घेण्याचा विचार करत असाल आणि मोठ्या सवलतीची वाट पाहत असाल, तर तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण ई-कॉमर्स साइट Flipkart वर 20 फेब्रुवारी दुपारपासून Flipkart Tablet Premier League 2025 (TPL 2025) सुरू झाला आहे.
या सेलमध्ये टॉप-रेटेड टॅब्लेट्स (Tablets) वर भरघोस सवलत दिली जात आहे, ज्यामुळे ग्राहक बजेटची चिंता न करता आपले डिव्हाइस अपग्रेड करू शकतात.
Flipkart Tablet Premier League 2025 मध्ये Samsung, Lenovo, Apple, Realme, OnePlus, Redmi, Mi, Poco आणि Infinix यांसारख्या टॉप-ब्रँडचे Tablets उपलब्ध असतील. या बेस्ट-सेलिंग टॅब्लेट्स (Best-selling tablets) वर 50% पर्यंत सूट मिळणार आहे. हा मर्यादित वेळेसाठी असलेला प्राइस ड्रॉप (Price drop) असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक्सचेंज ऑफर्स (Exchange offers) देखील मिळतील.
Flipkart Tablet Premier League 2025 मधील बेस्ट डील्स
Samsung Galaxy Tab S9 (Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, S-Pen समाविष्ट) फक्त ₹39,999 पासून उपलब्ध.
Lenovo Tab Plus (11.5” डिस्प्ले, Octa JBL स्पीकर) फक्त ₹13,749 मध्ये मिळेल.
Apple iPad 10th Generation (10.9” डिस्प्ले, A14 Bionic चिप) फक्त ₹28,999 मध्ये उपलब्ध.
OnePlus Pad Go (11.35” आय-केअर डिस्प्ले, Dolby Atmos साउंड) अवघ्या ₹15,749 मध्ये मिळेल.
Realme Pad 2 Lite (11” स्क्रीन, 4G सपोर्ट) केवळ ₹10,799 मध्ये उपलब्ध होईल.
याशिवाय Flipkart वर एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर आणि नो-कॉस्ट EMI (No-cost EMI) चाही लाभ घेता येईल. तसेच, Flipkart ची ‘Minutes’ Ultra-Fast Delivery सेवा निवडक पिनकोड्स (Pincodes) साठी फक्त 10 मिनिटांत टॅब्लेट डिलिव्हरी देणार आहे.