Apple चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. iPhone SE 4 आणि MacBook ची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी कंपनीकडून नवीन घोषणा करण्यात आली आहे. Apple 19 फेब्रुवारीला एक विशेष इव्हेंट आयोजित करत आहे, जिथे अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता आहे.
टिम कुक यांनी ‘X’ वर पोस्ट करत लिहिले, “Appleच्या नव्या सदस्याला भेटण्यासाठी सज्ज व्हा. Apple लाँच 19 फेब्रुवारी (बुधवार) रोजी होणार आहे.” त्यांच्या या घोषणेमुळे हे स्पष्ट झाले आहे की, Apple लवकरच नवीन डिव्हाइसेस सादर करणार आहे.
काय असतील नवीन प्रोडक्ट्स?
Bloombergच्या माहितीनुसार, iPhone SE 4 (2025) मार्केटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा फोन iPhone 14 च्या आधारावर डिझाइन केला जाणार आहे. टिपस्टरच्या माहितीनुसार, या डिव्हाइसमध्ये नॉच असणार आहे, म्हणजेच Apple Dynamic Island यामध्ये देणार नाही.
तसेच, डिझाइनच्या बाबतीत हा फोन iPhone 14 प्रमाणेच असेल. याआधी लाँच करण्यात आलेल्या SE 2 आणि SE 3 मॉडेल्सना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता, त्यामुळे Apple ला त्यांचे उत्पादन थांबवावे लागले होते.
iPhone SE सिरीजसाठी Apple कोणताही मोठा इव्हेंट आयोजित करणार नाही. हा फोन व्हिडिओ अनाउन्समेंटद्वारे सादर केला जाऊ शकतो. यावेळी कंपनीचा फोकस परवडणाऱ्या किंमतीत उत्कृष्ट फीचर्स असलेल्या iPhone वर असेल. भारतात नेहमीच कमी किमतीच्या iPhone मॉडेल्सची मागणी असते. समोर आलेल्या माहितीनुसार, लाँचनंतर 28 फेब्रुवारीपासून या फोनची विक्री सुरू होऊ शकते.
iPhone SE 4 चे संभाव्य फीचर्स
- 6.1 इंच OLED 460ppi Super Retina XDR डिस्प्ले
- A18 Chip सह 8GB रॅम सपोर्ट
- Apple Intelligence सपोर्ट आणि Apple मॉडम
- 48MP मुख्य कॅमेरा, 12MP फ्रंट कॅमेरा