भारतीय टेक ब्रँड Lava लवकरच आपली नवीन स्मार्टवॉच Lava Prowatch X भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनीने अधिकृत पोस्टरद्वारे या वॉचच्या लॉन्च डेटची घोषणा केली आहे. या स्मार्टवॉचमध्ये VO2 Max Measurement आणि Body Energy Monitoring यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळतील, जे प्रामुख्याने हाय-एंड स्मार्टवॉचमध्ये पाहायला मिळतात.
तसेच, यामध्ये आधुनिक डिझाइन आणि वेगवेगळ्या Strap Options देखील असतील. चला जाणून घेऊया Lava Prowatch X ची लॉन्च डेट आणि संभाव्य किंमत.
Lava Prowatch X लॉन्च डेट आणि उपलब्धता
Lava Prowatch X भारतात 15 फेब्रुवारी रोजी अधिकृत लॉन्च होणार आहे. ग्राहकांना ही स्मार्टवॉच 21 फेब्रुवारीपासून Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Lava Prowatch X ची संभाव्य किंमत
कंपनीने अद्याप अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही, पण ही स्मार्टवॉच ₹7,500 पेक्षा कमी किंमतीत लॉन्च होऊ शकते. अधिकृत पोस्टरमध्ये “Fit 360°” तंत्रज्ञानासह भारताची पहिली स्मार्टवॉच असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Lava Prowatch X चे फीचर्स
Lava च्या अधिकृत Teaser Poster वरून हे स्पष्ट होते की स्मार्टवॉचमध्ये Circular Dial असेल आणि उजव्या बाजूस दोन बटण दिले जातील. Fit 360° तंत्रज्ञानासह भारतातील पहिली स्मार्टवॉच म्हणून या घड्याळाची ओळख असेल. यामध्ये Heart Rate Variability (HRV), Body Energy Tracking आणि VO2 Max Measurement यांसारखे फीचर्स मिळतील.
ही स्मार्टवॉच Cardiovascular Fitness चे अचूक Monitoring करेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Athletes आणि Fitness Enthusiasts साठी ही एक महत्त्वाची सुविधा असेल. VO2 Max Tracking ही खास Running, Cycling आणि Workout दरम्यान शरीराची कार्यक्षमता मोजण्यासाठी मदत करेल.
याशिवाय, या स्मार्टवॉचमध्ये Body Energy Monitoring फीचर दिले जाईल, जे Real-Time मध्ये ऊर्जा पातळी मोजण्यासाठी Heart Rate, Stress Level, Sleep Quality आणि Daily Activity चा डेटा विश्लेषण करेल.