टेक ब्रँड लावा (Lava) ने त्यांच्या Pro सीरीजमधील दमदार अॅक्सेसरीजसाठी 26 जानेवारीला खास डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. या गणराज्य दिनानिमित्त Prowatch ZN Smartwatch आणि Probuds T24 Earbuds केवळ 26 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहेत. ही मोठी संधी ‘रिपब्लिक डे सेल’ अंतर्गत मिळणार आहे आणि ही ऑफर केवळ मर्यादित वेळेसाठी उपलब्ध असेल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, Prowatch ZN Smartwatch आणि Probuds T24 Earbuds यांच्या पहिल्या 100 युनिट्सवर हा खास डिस्काउंट मिळणार आहे. ग्राहक हे डिव्हायसेस लावा ई-स्टोअरवरून 26 जानेवारीला दुपारी 12 वाजता फक्त 26 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. भारताच्या 76व्या गणराज्य दिनानिमित्त या डिव्हायसेसच्या MRP वर तब्बल 76 टक्क्यांचा डिस्काउंट दिला जात आहे.
कूपन कोड वापरून मिळवा सूट
लावाची अधिकृत वेबसाइट https://www.lavamobiles.com/ वर ही खास सेल 26 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरू होईल. ग्राहकांनी Prowatch ZN Smartwatch किंवा Probuds T24 Earbuds कार्टमध्ये अॅड केल्यानंतर, अनुक्रमे ‘Prowatch’ आणि ‘Probuds’ हे कूपन कोड वापरावे लागतील. स्टॉक उपलब्ध असल्यास हे वियरेबल्स केवळ 26 रुपयांत खरेदी करता येतील.
Prowatch ZN चे फीचर्स
लावा स्मार्टवॉच दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे – वल्येरियन ग्रे आणि ड्रॅगन ग्लास ब्लॅक. यात 1.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा दिली आहे. फुल चार्ज केल्यानंतर याची बॅटरी 7 दिवसांपर्यंत टिकते. हेल्थ आणि फिटनेससाठी यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 लेव्हल ट्रॅकिंग, आणि स्लीप पॅटर्न अॅनालिसिस यांसारखे फीचर्स आहेत. ही IP68 रेटेड वॉच असून त्यावर 2 वर्षांची वॉरंटी मिळते.
Probuds T24 चे फीचर्स
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च झालेल्या Probuds T24 Earbuds मध्ये 10mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत आणि क्वॉड माइक ENC (Environmental Noise Cancellation) तंत्रज्ञानामुळे कॉलिंगचा अनुभव अधिक चांगला होतो. यात Bluetooth v5.4 कनेक्टिव्हिटी असून 35ms अल्ट्रा लो-लेटन्सी दिली आहे. पूर्ण चार्ज केल्यावर हे इयरबड्स 45 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक देऊ शकतात.
किंमत आणि ऑफर
बजेट स्मार्टवॉच Prowatch ZN ची किंमत ₹2,599 आहे, तर Probuds T24 Earbuds ग्राहकांना ₹1,299 मध्ये खरेदी करता येतात. मात्र, गणराज्य दिनानिमित्त या डिव्हायसेस फक्त ₹26 मध्ये खरेदी करण्याची अनोखी संधी मिळत आहे.