नॉइजने भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टवॉच लाँच केल्या आहेत. या स्मार्टवॉचचे नाव Noise ColorFit Pro 6 आणि Noise ColorFit Pro 6 Max आहे. नॉइज कलरफिट 6 मेश स्ट्रॅप, मॅग्नेटिक स्ट्रॅप, ब्रेडेड स्ट्रॅप आणि सिलिकॉन स्ट्रॅपसह येते.
सिलिकॉन, मॅग्नेटिक आणि ब्रेडेड स्ट्रॅप वेरिएंटची किंमत ₹5,999 आहे. तर, मेश स्ट्रॅप वेरिएंटसाठी ₹6,499 मोजावे लागतील. या वॉचची प्री-बुकिंग 22 जानेवारीपासून सुरू होईल आणि विक्रीसाठी 27 जानेवारीपासून उपलब्ध होईल.
नॉइज कलरफिट प्रो 6 मॅक्समध्ये कंपनीने मेटल स्ट्रॅप, मॅग्नेटिक स्ट्रॅप, लेदर स्ट्रॅप आणि सिलिकॉन स्ट्रॅपचे पर्याय दिले आहेत. यातील मॅग्नेटिक, लेदर आणि सिलिकॉन स्ट्रॅप वेरिएंटची किंमत ₹7,499 आहे, तर मेटल स्ट्रॅप वेरिएंटची किंमत ₹7,999 आहे. ही वॉच आजपासूनच विक्रीसाठी उपलब्ध आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Noise ColorFit Pro 6 Max मध्ये 1.96 इंचाचा AMOLED डिस्प्ले असून, तो 410×502 पिक्सल रिझोल्यूशनसह येतो. तर, ColorFit Pro 6 मध्ये 1.85 इंचाचा AMOLED डिस्प्ले असून, त्याचे रिझोल्यूशन 390×450 पिक्सल आहे. या दोन्ही वॉचमध्ये Always On Display फीचर देण्यात आले आहे. यामध्ये AI वॉच फेस आणि AI कंपॅनियन उपलब्ध आहे. प्रोसेसरसाठी EN2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
नॉइजच्या या नवीन वॉचेस Noise Health Suite सोबत येतात, ज्यामध्ये हार्ट रेट सेन्सर, SpO2 लेव्हल आणि स्ट्रेस सेन्सर समाविष्ट आहेत. तसेच, 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड देखील दिले आहेत. ऑपरेटिंग सिस्टमसाठी या वॉचेस Nebula UI 2.0 वर कार्य करतात. कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.3 दिला आहे.
वॉटरप्रूफिंगसाठी ColorFit Pro 6 Max ला 5ATM सपोर्ट, तर ColorFit Pro 6 ला IP68 रेटिंग देण्यात आली आहे. यामध्ये दिलेली बॅटरी पावरफुल असून, कंपनीच्या मते एकदा चार्ज केल्यानंतर ती 7 दिवसांपर्यंत टिकते. या वॉचेसमध्ये इंटेलिजंट नोटिफिकेशन, जेश्चर, इमर्जन्सी SOS, आणि पासवर्ड प्रोटेक्शन असे अनेक फीचर्स आहेत.