डिसेंबर महिना आला की, स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठे बदल होणार आहेत. 2024 च्या अखेरीस भारतीय बाजारात अनेक दमदार Smartphones लाँच होणार आहेत, जे प्रत्येक बजेटसाठी आकर्षक पर्याय देतील. चला, पाहुया डिसेंबरमध्ये लाँच होणाऱ्या काही Smartphones ची यादी आणि त्यांचे खास फीचर्स.
iQOO 13
लाँच डेट: 3 डिसेंबर iQOO 13 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 3 डिसेंबरला लॉन्च होईल. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह 16GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह येईल. त्यात 120W फास्ट चार्जिंग आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. त्याचा 6.82 इंच Q10 2K 144Hz LTPO AMOLED डिस्प्ले खास आहे.
Redmi Note 14 5G
लाँच डेट: 9 डिसेंबर Redmi Note 14 5G भारतात 9 डिसेंबरला लॉन्च होईल. हा स्मार्टफोन Dimensity 7025 Ultra प्रोसेसरसह 12GB RAM आणि 50MP LYT-600 ड्युअल कॅमेरा सेटअपसोबत येईल. त्यात 45W फास्ट चार्जिंग आणि 5110mAh बॅटरी आहे. डिस्प्ले 6.67 इंच फुलHD+ AMOLED आहे.
Redmi Note 14 Pro
लाँच डेट: 9 डिसेंबर Redmi Note 14 Pro मध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर आहे. यात 50MP LYT-600 ट्रिपल रियर कॅमेरा आणि 20MP सेल्फी कॅमेरा मिळेल. 5,500mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सोबत 6.67 इंच 1.5K OLED डिस्प्ले मिळेल.
Redmi Note 14 Pro Plus
लाँच डेट: 9 डिसेंबर हे Redmi Note 14 सीरीजमधील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आहे. Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरसह, यात 50MP+50MP+8MP रियर कॅमेरा सेटअप आणि 6000mAh बॅटरी मिळेल. त्याची डिस्प्ले 6.67 इंच 1.5K OLED असून 120Hz रिफ्रेश रेट आहे.
Realme 14x
लाँच डेट: डिसेंबरमध्ये Realme 14x हा स्मार्टफोन मिड-बजेट सेगमेंटमध्ये 15,000 रुपयांच्या आसपास लाँच होईल. यात 50MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी असू शकते. हा स्मार्टफोन Realme GT 7 Pro नंतर लाँच होण्याची शक्यता आहे.
Vivo X200
लाँच डेट: डिसेंबरमध्ये Vivo X200 मध्ये MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर आणि 16GB RAM असेल. त्यात 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 90W फास्ट चार्जिंगसह 5,800mAh बॅटरी मिळेल. डिस्प्ले 6.67 इंच 1.5K OLED आहे.
Vivo X200 Pro
लाँच डेट: डिसेंबरमध्ये Vivo X200 Pro हा 200MP कॅमेरासह येईल. हा स्मार्टफोन 16GB RAM आणि 6,000mAh बॅटरीसह 90W वायर्ड आणि 30W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. त्यात 6.78 इंच 1.5K OLED डिस्प्ले मिळेल.
Realme Narzo 70 Curve
लाँच डेट: डिसेंबरमध्ये Realme Narzo 70 Curve हा मिड-बजेट स्मार्टफोन असेल. यामध्ये MediaTek Dimensity प्रोसेसर आणि 8GB RAM असू शकतात. याची इतर फीचर्स लवकरच समोर येतील.
डिसेंबर 2024 मध्ये अनेक दमदार स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. प्रत्येक फोन त्याच्या फीचर्स आणि डिझाइनसह विविध बजेटमध्ये उपलब्ध असेल. या फोनमधून तुमच्यासाठी योग्य स्मार्टफोन निवडून, तुम्ही 2024 चा अखेरचा महिना एक नवा स्मार्टफोन घेऊन मनाशी साजरा करू शकता.