8th Pay Commission Update: केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी महागाईच्या वाढत्या दरामुळे त्यांच्या पगारात वाढीची मागणी करत आहेत. ही मागणी लक्षात घेऊन, 8व्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट्स आलेल्या आहेत. वेतन आयोगाच्या (Pay Commission) शिफारशींनुसार, भारतातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो.
वेतन आयोगाचे अपडेट्स आणि पगारवाढ
भारत सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी (Basic Salary) मध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. देशातील 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी अनेक वर्षांपासून त्यांच्या पगारात वाढ होण्याची वाट पाहत होते. 2024 च्या बजेटमध्ये (Budget) ही वाढ अपेक्षित होती, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झाली नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार, यावर्षी दिवाळीपासून (Diwali) कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव सॅलरी जमा होऊ शकते.
बेसिक सॅलरी वाढीची शक्यता:
कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे की बेसिक सॅलरी किमान 26,000 रुपये असावी. काही अहवालांनुसार, पगारात 20% ते 35% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लेवल 1 (Level 1) कर्मचाऱ्यांचा पगार 34,560 रुपये तर लेवल 18 (Level 18) चा पगार 4.8 लाख रुपये होऊ शकतो.
वेतन आयोग किती वर्षांनी लागू होतो?
भारतामध्ये आतापर्यंत 7 वेतन आयोग लागू झाले आहेत. पहिला वेतन आयोग 1946 मध्ये आला होता. शेवटचा म्हणजे 7वा वेतन आयोग 2014 मध्ये तयार झाला होता. आता 8व्या वेतन आयोगासाठी (8th Pay Commission) तयारी सुरू आहे. 1 कोटी 12 लाख कर्मचारी आणि पेन्शनर्सना याचा फायदा होईल.