India Vs Pakistan: भारताचा लीजंड्स संघ पाकिस्तानकडून हरला, इरफान पठाणने 1 षटकात 25 धावा दिल्या

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 च्या 8 व्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 68 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात पाकिस्तानने 243 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया फक्त 175 धावा करू शकली.

Rupali Jadhav
Ind Vs Pak World Legends Championship 2024
Ind Vs Pak World Legends Championship 2024

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 चा 8 वा सामना शनिवारी रात्री भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते कारण ते त्यांचे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर एकमेकांविरुद्ध पाहायला मिळणार आहेत.

- Advertisement -

चाहत्यांच्या अपेक्षेनुसार, हा सामना उच्च स्कोअरिंगचा होता, या सामन्यात भारताला 68 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात इरफान पठाणने 1 षटकात 25 धावा दिल्या, तर युवराज सिंगसारखा खेळाडूही अपयशी ठरला. या सामन्याबद्दल जाणून घेऊया-

युवराज सिंगच्या दुखापतीमुळे हरभजन सिंगने या सामन्याचे नेतृत्व केले. या सामन्यात युवीने केवळ फलंदाजाची भूमिका बजावली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा भज्जीचा निर्णय भारताला महागात पडला.

- Advertisement -

सलामीवीर कामरान अकमल आणि शरजील खान या जोडीने भारतीय गोलंदाजांचा बँड चोख बजावला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 10.5 षटकांत 145 धावांची भागीदारी झाली. या काळात कामरानने 40 चेंडूत 70 धावा केल्या आणि शरजीलने 30 चेंडूत 72 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या सोहेब मकसूदने 26 चेंडूत 51 धावांची खेळी करत धावसंख्या 200 च्या पुढे नेली. उर्वरित टास्क शोएब मलिकने 25 धावा करून पूर्ण केले.

- Advertisement -

पाकिस्तानसाठी या डावात इरफान पठाण खूप महागडा ठरला, त्याने या डावात फक्त एकच षटक टाकले ज्यात त्याने 25 धावा खर्च केल्या.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 4 गडी गमावून 243 धावा केल्या. लिजेंड्स चॅम्पियनशिपमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोअर आहे.

244 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला 20 षटकात 9 विकेट गमावून केवळ 175 धावा करता आल्या. सुरेश रैना एका टोकाला एकटाच लढत राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. रैनाने 52 धावांची शानदार खेळी केली. युवराज सिंग १४ धावा करून बाद झाला, तर युसूफ पठाणला खातेही उघडता आले नाही.

भारतावरील या विजयासह पाकिस्तानने स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. मेन इन ग्रीन 6 गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे, तर भारत तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.

TAGGED: