Breaking News

घरात मनी प्लांट ची वेल असेल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा अन्यथा होऊ शकता कंगाल

मनी प्लांट घरात ठेवल्यामुळे, आपले घर नेहमीच सकारात्मक उर्जेचे केंद्र राहते आणि परंतु या बद्दल च्या काही चुका आपल्याला आर्थिक संकटा मध्ये घेऊन जाऊ शकते. घरात मनी प्लांट ठेवत असताना त्याच्या दिशेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे कारण जर दिशा संबंधित काही चुका असतील तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

मनी प्लांटचा रोप कधीही घराच्या ईशान्य दिशेने ठेवू नये, या दिशेने ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा येऊ लागते.

घराच्या ईशान्य कोपऱ्या मध्ये मनी प्लांट ठेवल्यास एखाद्याच्या आयुष्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ईशान्य कोपऱ्यात मनी प्लांट ठेवू नये.

जर मनी प्लांट घरात ठेवला असेल तर तो कधीही वाळू नये याची काळजी घेतली पाहिजे, त्याला दररोज पाणी द्या कारण वाळलेल्या वनस्पतीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

ज्या मनी प्लांटची वेल जमिनीवर पसरण्यास सुरवात होते अशा वेळी भिंतींच्या साहाय्याने त्वरित अशी वेल वरच्या बाजूस ठेवा, यामुळे घरात पैसे नक्कीच वाढतील. तसेच मनी प्लांट कधीही घराबाहेर लावू नये ज्यामुळे तुम्हाला नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

जर आपण मनी प्लांटच्या योग्य दिशेबद्दल बोललो तर दक्षिण-पूर्व दिशा सर्वात फायदेशीर आहे आणि त्या दिशेने राहिल्यास घरात पैशाचा मार्ग खुला राहतो.

वास्तुशास्त्रानुसार असेही मानले जाते की मनी प्लांटची रोपे घरात ठेवणे उपयुक्त ठरते आणि यामुळे तुमच्या आयुष्यातील यशाचा मार्ग बळकट होतो.

About Marathi Gold Team