astrology

या 9 मंत्रांनी दूर होतात नवग्रहांचे दोष, बदलू शकते तुमचे नशीब

ज्योतिष शास्त्र हे नवग्रहांच्या वर अवलंबून आहे. हे नवग्रह कुंडली मध्ये कोणत्या स्थानी आहेत, त्यांनी कोणासोबत युती केली आहे, कोणते योग आहेत इत्यादीवर अवलंबून असते. त्यामध्ये जर एखाद्या अशुभ ग्रहा सोबत चांगल्या ग्रहाची युती झाली असेल किंवा दोघे एकाच घरात असतील तर वाईट फळे देतात. त्यामुळे कुंडली मधील नवग्रहांचे स्वताचे असे वेगवेगळे मंत्र आहेत.येथे आपण पाहू कोणत्या ग्रहाचा कोणता मंत्र आहे. कुंडली मधील अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्या ग्रहाचा मंत्र जप केला पाहीजे.

मंत्र जप करण्याची सामान्य पद्धत

ज्या ग्रहाचा मंत्र जप करायचा आहे त्या ग्रहाची विधिवत पूजा करा. पूजे मध्ये सर्व आवश्यक सामग्री चढवा. यासाठी तुम्ही ब्राम्हणाची मदत घेऊ शकता. पूजे मध्ये संबंधीत ग्रहाचा मंत्र जप करावा. मंत्र जपाची संख्या कमीतकमी 108 असावी. मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्ष माळेचा वापर केला जाऊ शकतो.

हे आहेत नवग्रहांचे उपाय

सूर्य : ॐ सूर्याय नमः मंत्राचा जप करावा. रोज सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करा आणि गुळाचे दान करा.

चंद्र : ॐ सोमाय नमः मंत्राचा जप करावा. रोज शिवलिंगावर चांदीच्या भांड्याने पाणी अर्पण करा.

मंगळ : ॐ भौमाय नमः मंत्राचा जप करावा.मसूरच्या डाळीचे दान करा. शिवलिंगावर लाल फुल वाहावे.

बुध : ॐ बुधाय नमः मंत्राचा जप करावा. कोणत्याही तृतीयपंथीयास हिरव्या बांगड्या दान करा. गणपतीला दुर्वा वाहाव्यात.

गुरु : ॐ बृहस्पतये नमः मंत्राचा जप करावा. गुरुवारी शिवलिंगावर हळकुंड वाहावे. बेसन लाडू गरिबांना खाण्यास द्यावे.

शुक्र : ॐ शुक्राय नमः मंत्राचा जप करावा. दर शुक्रवारी लक्ष्मीला अत्तर वाहावे. शंकरास खीरीचे नैव्यद्य द्यावे.

शनी : ॐ शनैश्चराय नमः मंत्राचा जप करावा. शनिवारी चप्पल-बूट यांचे दान करावे. हनुमान चालीसा पाठ करावा.

राहू-केतू : ॐ राहवे नमः मंत्राचा जप करावा. तसेच केतू ग्राहासाठी ॐ केतवे नमः मंत्राचा जप करावा. कोणत्याही गरिबास काळी घोंगडी दान करावी.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 6 उपाय घराला गरिबी पासून वाचवू शकतात


Show More

Related Articles

Back to top button