Connect with us

वय अवघे 6 वर्षे पण दिवसाची कमाई 1 लाख रुपये, वाचा कसे कमवतो पैसे

Inspiration

वय अवघे 6 वर्षे पण दिवसाची कमाई 1 लाख रुपये, वाचा कसे कमवतो पैसे

बहुतांश लोक रिटायर्ड होतात पण 1 लाख रुपये प्रती महीना कमवू शकत नाहीत पण हा 6 वर्षाचा मुलगा दिवसाला 1 लाख रुपये कमवतो. ज्याचा तुम्ही आम्ही कदाचित स्वप्नात पण विचार केला नसेल.

6 Year Old Nihal Raj Earns Rs 1 Lakh Daily

 

ज्या वयामध्ये मुले खेळणे बागडणे शिकतात त्यावयात या लहान मुलाने फार मोठे लक्ष साध्य केले आहे. होय हे खरे आहे की या लहान वयात हा मुलगा लाखो रुपये कमवत आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य झाले असेल पण हे त्याने करून दाखवले आहे.

केरळच्या कोच्चि मध्ये राहणारा निहाल वयाने अवघा 6 वर्षाचा आहे पण त्याच्या कडे प्रतिभा भरपूर आहे आणि म्हणतात ना जर शिकण्याची इच्छा असेल तर माणूस कोणतीही कला सहज साध्य करू शकतो आणि यासाठी कोणतेही वयाचे बंधन नसते. निहाल असाच आपल्या इच्छेच्या बळावर आणि आवडीमुळे त्याच्या आई कडून कुकिंग शिकला आहे.

 

निहाल काही वर्षापूर्वी त्याच्या आईला किचनमध्ये मदत करत होता. त्यावेळी त्याचे वडील या सर्वाचे व्हिडीओ बनवत होते. हा व्हिडीओ नंतर निहालच्या वडिलांनी फेसबुकवर शेयर केला. लोकांना हा व्हिडीओ फार आवडला आणि तो व्हायरल झाला. यानंतर निहालच्या वडिलांनी युट्युब चैनल बनवला आणि तेथे ते निहालचे व्हिडीओ अपलोड करू लागले. निहाल राज चा चैनल जानेवारी 2015 मध्ये युट्युबवर तयार करण्यात आला होता.

 

निहालला अमेरिकन पोपुलर शो ‘एलेन डी जेनरेस’ शो मध्ये पुटटू नावाची एक रेसिपी करण्यासाठी अवार्ड पण मिळाला आहे. तो युट्युबवर स्वताचा कुकरी शो चालवतो. कुकरी शो मध्ये तो अतिशय इनोवेटीव रेसेपी बनवतो. सॉल्टीन डिशेज पेक्षा जास्त त्याला डेजर्ट बनवणे आवडते. मिकी माउस मैन्गो रेसिपी मुळे त्याला फेसबुकवर एक स्लॉट पण दिला गेला. या स्लॉट मध्ये त्याला 2000 डॉलर म्हणजेच 1,33521 रुपये दिले गेले.

 

युट्युब वरील त्याच्या चैनलमुळे निहालला फार प्रसिद्धी मिळाली ज्यामुळे त्याला अनेक लोकप्रिय शेफना भेटण्याची संधी मिळाली. निहाल आता पर्यंत संजीव कपूर, कुणाल कपूर इत्यादी प्रसिध्द शेफना भेटला आहे. निहालला अनेक कुकिंग रियालिटी शो मध्ये येण्याची ऑफर मिळाली आहे. आहे ना प्रेरणा देणारी पोस्ट या पोस्ट मधून आपण शिकू शकतो की शिकण्यासाठी कोणतेही बंधन नसते आणि ऑनलाईन कमाईची कोणतीही मर्यादा नाही आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top